जत-अथणी राज्य महामार्गावर येळदरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिळूर येथील ३५ वर्षीय महिबूब रज्जाक पटेल यांचा जागीच मृत्यू. जत पोलिसांत गुन्हा दाखल.
जत : जत-अथणी राज्य महामार्गावर येळदरी गावाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत बिळूर येथील महिबूब रज्जाक पटेल (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे बिळूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महिबूब पटेल हे बिळूर येथील रहिवासी असून, गावात त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी ते काही कामानिमित्त ज-त शहरात आले होते. काम आटोपून दुपारी तीनच्या सुमारास ते आपल्या गावी बिळूरकडे परत जात होते. जत शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर येळदरी गावाजवळ पोहोचले असता, एका अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेदेखील वाचा: बेंगळुरूमध्ये 7 जणांची हत्या; अल्पवयीन मुलीच्या सहभागाचा संशय, कॅब चालकाला अटक
अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ज-त उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.
या अपघातप्रकरणी ज-त पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासह पुढील तपास पोलीस करीत आहेत.
