Tag: सांगली जिल्हा बातम्या

नेलकरंजीतील जकाई देवीचे चांदीचे दागिने चोरीप्रकरणी सात जणांना अटक; 9.39 लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात नेलकरंजी येथे जकाई देवीचे चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. सात जणांना अटक करून ४ किलो २४३ ग्रॅम चांदीचे दागिने आणि…

सांगली जिल्हा बँक निवडणूक : उमदीत पवार बंधूंवर अपहरणाचा गुन्हा; सावंतांचा भाजपवर आरोप

सांगली जिल्हा बँकेच्या जत ‘अ’ गटाच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष तीव्र. सोनलगीच्या मतदाराच्या कथित अपहरणप्रकरणी विनोद पवार, सुनील पवार यांच्यासह चौघांवर गुन्हा. विक्रमसिंह सावंत यांचा भाजपवर पूर्वनियोजित कटाचा आरोप. जत :…

सांगली जिल्हा गुन्हे वृत्त : जत अत्याचार प्रकरण, सांगलीत 2 शिक्षकांवर गुन्हा, बँक फसवणूक प्रकरणात अटक

सांगली जिल्ह्यात चार गुन्हेगारी घटना. जत येथे लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराची तक्रार, सांगलीत दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा, ईश्वरपूर बँक फसवणूक प्रकरणात संशयिताला अटक आणि कुपवाडमध्ये लाखोंची चोरी. सांगली : सांगली जिल्ह्यात…

जत तालुक्यात दोन घटना; अपघातात 19 वर्षीय तरुण ठार, उमदीत हाणामारी

जत तालुक्यातील मेंढिगिरी येथे दुचाकी-ट्रॅक्टरच्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. उमदी विठ्ठलवाडीत पाणंद रस्त्याच्या वादातून हाणामारी व दगडफेक; पोलिस कर्मचाऱ्यासह पाच ते सहा जण जखमी. जत : जत तालुक्यात…

जत येथे लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांसाठी निवेदन; लाभ पुन्हा सुरू करण्याची मागणी

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असूनही लाभ बंद झालेल्या महिलांना पुन्हा योजनेत सहभागी करून लाभ पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने जत तहसीलदारांकडे केली. जत : मुख्यमंत्री…

जतच्या डफळे संस्थानचा ऐतिहासिक दसरा; चिणगीबाबांच्या बुरुजावर पांढरा ध्वज

जत येथे डफळे संस्थानच्या परंपरेनुसार चिणगीबाबांच्या बुरुजावर पांढरा ध्वज फडकवून दसरा उत्सवाला प्रारंभ झाला. पालखी मिरवणूक, शस्त्रपूजा आणि शमीच्या पानांची लूट करून सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. जत : जतच्या श्रीमंत…

जतच्या मॉडेल स्कूलमध्ये गोष्टींतून संस्कारांची पेरणी; विशाखा सावंत यांचा अभिनव उपक्रम

जत येथील मॉडेल स्कूल नंबर १ मध्ये शिक्षिका विशाखा सावंत यांनी मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या ‘हसत-खेळत शहाणीव’ बालकथासंग्रहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी आणि संस्कार रुजवण्याचा उपक्रम राबवला. जत : पुस्तकातील गोष्टी…

जत तालुक्यात आई-मुलीचा मृत्यू; मायथळ येथे कौटुंबिक वादातून विहिरीत उडी

जत तालुक्यातील मायथळ येथे कौटुंबिक वादातून आईने दीड वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेतल्याची घटना. आई आणि मुलीचा मृत्यू; उमदी पोलिसांचा तपास सुरू. जत : मायथळ (ता. जत) येथील सोलनकर वस्तीवर…

जतचा दुष्काळ गंभीर; खरीप गेला, चारा संपला, पशुधन संकटात : पंचनाम्यांच्या कागदी प्रक्रियेपेक्षा तातडीने चारा, पाणी आणि आर्थिक मदत देण्याची मागणी

जत तालुक्यात दुष्काळामुळे खरीप हंगामानंतर पशुधनाच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. चारा डेपो, टँकर वाढवून तातडीने मदत देण्याची मागणी. जत : पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर…

जत : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस चार वर्षे सक्तमजुरी; 50 हजारांचा दंड

जत तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जगदिश चव्हाण याला सांगली न्यायालयाने ४ वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सांगली : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जगदिश सुभाष चव्हाण…