अत्याचार

अत्याचार सहन न झाल्याने पीडित मुलीने एकटीनेच गाठले पोलीस ठाणे

आयर्विन टाइम्स /पुणे
एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापासह चार जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड परिसरात घडली आहे. सुरुवातीला एका नराधमाने सोशल मीडियावरील व्हिडीओप्रमाणे शरीरसंबंध करू, असे म्हणून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिच्या शिक्षिकेच्या पतीने व आईच्या मैत्रिणीच्या पतीने व दिराने, तसेच जन्मदात्या पित्याने मुलीवर अत्याचार केला. अत्याचार सहन न झाल्याने पीडित मुलीने एकटीनेच पोलीस स्टेशन गाठले आणि आपबिती कथन केली. या प्रकरणी नराधम पित्यासह पाच जणांना अटक करण्यात आली.

पिंपरी- चिंचवड शहरातील चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ एप्रिल ते २९ जून २०२४ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी पीडित १३ वर्षीय मुलीने शुक्रवारी (दि. ५) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. समाधान लवटे (वय ४०), प्रताप प्रमोद धायतडे, नितीन हराळे (३२, तिघे रा. चिखली), सागर हराळे (२०, रा. मोहननगर, आकुर्डी) आणि पीडित मुलीचा पिता यांच्या विरोधात पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३७६ (२) (आय), ३७६ (सी), ३५४, ३५४ (ए), ५०६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासन संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे.

अत्याचार
चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही यू- ट्यूबवर व्हिडीओ पाहत होती. त्यावेळी तेथे आलेला समाधान लवटे म्हणाला, मी पण या व्हिडीओप्रमाणे तुझ्यासोबत करतो. त्यानंतर पीडित मुलीला त्याच्या घरी घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराबाबत पीडित मुलीने तिच्या वडिलांना सांगितले. याबाबत कोणाला काही सांगू नको, आपली इज्जत खराब होईल, असे तिच्या वडिलांनी सांगितले. त्यानंतर पीडित मुलगी घरात झोपलेली असताना तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी मुलीने विरोध केला असता कोणास काही सांगितले तर तुझे तुकडे करेन, असे धमकावले.

दरम्यान, पीडित मुलगी ट्यूशनसाठी शिक्षिकेच्या घरी गेली. त्यावेळी घरात कोणी नसताना शिक्षिकेच्या पतीने गैरकृत्य करून जबरदस्ती केली. त्यानंतर १९ मे रोजी पीडित मुलीच्या आईच्या मैत्रिणीच्या दिराने गैरकृत्य केले. तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे बोलून जबरदस्ती केली. त्यानंतर २ जून रोजी पीडित मुलगी आईच्या मैत्रिणीच्या घरी गेली असता, मैत्रिणीच्या पतीने गैरकृत्य केले. त्यानंतर २९ जून रोजी रात्री तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केले.

एकटीनेच गाठले पोलिस ठाणे

अल्पवयीन मुलगी शुक्रवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. मात्र, जन्मदात्या पित्याकडून तसेच परिचयातील व्यक्तींकडून सुरु असलेले अत्याचार, जबरदस्ती सहन न झाल्याने एकटीच शाळेतून थेट चिखली पोलिस ठाणे गाठून आपबिती कथन केली. २०१२ चे कलम ४, ८, १२, २१ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पीडितेच्या पित्यासह समाधान लवटे, प्रताप धायतडे, सागर हराळे, नितीन हराळे यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

हे देखील वाचा: Exciting! महिला पोलिसासह कर्मचाऱ्याला पेटविण्याचा प्रयत्न; पुण्यातील घटनेने खळबळजनक घटना, १ जण ताब्यात

रिलच्या मोहात युवकाने गमावला जीव; महामार्गावर दुभाजकाला मोटारसायकल धडकून मृत्यू

आयर्विन टाइम्स / बीड
दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण रिल बनवताना दुचाकी चालकाने त्याच्याकडे पाहत स्माइल देण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत चालकाचे लक्ष विचलित झाल्याने दुचाकी दुभाजकावर धडकली व या अपघातात रील बनवणारा तरुण जागीच ठार झाला. तर, दुचाकी चालकही गंभीर जखमी झाला. अनिरुद्ध कळकुंबे (वय २५) असे या घटनेत ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मधू शेळके (वय ३०) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

दोघेही जालना शहरातील गणेशपूर भागातील रहिवासी आहेत. मधू शेळके व अनिरुद्ध कळकुंबे शुक्रवारी (ता.पाच) सकाळी दुचाकीवरून (एमएच २१, एम ११५४) बीडमार्गे तुळजापूरला जात होते. मधू दुचाकी चालवत होता तर अनिरुद्ध त्याच्यामागे बसलेला होता. बीडजवळील बाह्यवळण रस्त्यावर दुचाकी आली असतानाच अनिरुद्ध हा आपल्या मोबाइलवर रिलसाठी व्हिडिओ तयार करू लागला. यावेळी दुचाकीचालक असलेल्या मधू शेळकेचे लक्ष विचलित झाले. त्यामुळे दुचाकी बाजूच्या कठड्यावर जाऊन धडकली.

या अपघातात अनिरुद्धच्या डोक्याला व छातीला गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला. तर दूरपर्यंत फरपटत गेल्याने मधू शेळकेच्या दोन्ही पायांना गंभीर मार लागला असून दोन्ही पाय मोडले आहेत. शनिवारी (ता. सहा) सोशल मीडियावर ही रिल व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली. या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. जखमीला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले होते. याप्रकरणाची शनिवारी दुपारपर्यंत बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती.

धुळे-सोलापूर महामार्ग अतिशय वर्दळीचा असा आहे. या मार्गावर सातत्याने अवजड वाहतूक होत असते. या धोक्याकडे दुर्लक्ष करून अनिरुद्धने रील बनवण्यासाठी मोबाइल काढला. या रिलमध्ये सहभागी होण्यासाठी मधूने मागे वळून स्मितहास्य केले. मात्र याच दरम्यान वाहन अनियंत्रित होऊन दुभाजकाला- धडकले व दुर्घटना घडली. रीलसाठी केलेले हास्य क्षणातच विरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *