खैराव येथे कै. विष्णू क्षिरसागर

जत तालुक्यातील खैराव येथे कै. विष्णू सतीश क्षिरसागर यांच्या स्मरणार्थ क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात पार पडली. तीन वयोगटांत १०१ मुला-मुलींचा सहभाग; विजेत्यांना ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरव.

खैराव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, आरोग्यविषयक जागरूकता आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागावी, या उद्देशाने खैराव (ता. जत) येथे कै. विष्णू सतीश क्षिरसागर यांच्या स्मरणार्थ भव्य क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी पार पडलेल्या या स्पर्धेत विविध गावांतील १०१ मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय विष्णू क्षिरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जत पंचायत समितीचे सदस्य विजय रूपनूर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. संत भिमदास बाबा करांडे माध्यमिक विद्यालय, खैराव येथून स्पर्धेला सुरुवात झाली. येळवी रोडवरील मार्गावर एक, तीन आणि पाच किलोमीटर अशा अंतरांच्या स्पर्धा विविध वयोगटांत पार पडल्या.

हेदेखील वाचा : जतसाठी आनंदाची बातमी! दोड्डनाला, गुड्डापूर तलावात म्हैसाळचे पाणी; संख आरोग्य केंद्र प्रथम

स्पर्धेतील विजेते असे :

एक किलोमीटर – १२ वर्षांखालील गट

मुले : प्रथम श्रीवर्धन नरळे (महमदाबाद), द्वितीय श्रीकृष्ण बिचुकले (हंगीरगे), तृतीय महेश पुजारी (हुन्नूर).

मुली : प्रथम वृषाली नरळे (महमदाबाद), द्वितीय अश्विनी टोणे (खैराव), तृतीय सृष्टी व्हनमाने (माडग्याळ).

तीन किलोमीटर – १५ वर्षांखालील गट

मुले : प्रथम अजय राठोड (बालाजीनगर), द्वितीय करण गेजगे (हुन्नूर), तृतीय प्रशांत नरळे (महमदाबाद).

मुली : प्रथम शिवानी बावचे (बालाजीनगर), द्वितीय आरुषी पवार (बालाजीनगर), तृतीय स्नेहा हाक्के (माडग्याळ).

पाच किलोमीटर – १८ वर्षांखालील गट

मुले : प्रथम रविराज नरळे (महमदाबाद), द्वितीय मयूर रेवे (रेवेवाडी), तृतीय उत्तम गळवे (येळवी).

मुली : प्रथम अक्षरा पवार (बालाजीनगर), द्वितीय राणी करांडे (कुलाळवाडी), तृतीय शुभांगी धुलगुडे (खैराव).

खैराव येथे कै. विष्णू क्षिरसागर

सर्व विजेत्यांना ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र, रोख पारितोषिक आणि टी-शर्ट देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील नवोदित धावपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले.

या स्पर्धेचे आयोजन विष्णू मॅन्युफॅक्चरिंग अँड सप्लायर्सचे मालक सतीश क्षिरसागर यांनी केले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिद्धेश्वर कोरे, महेश कोळी, सार्थक जिपटे आणि मनोज नरळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धेदरम्यान येळवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी रुग्णवाहिका व आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली होती. जत पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारीही बंदोबस्तासाठी उपस्थित होते. संत भिमदास बाबा करांडे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी पंचायत समिती सदस्य विजय रूपनूर, दैनिक पुण्यनगरीचे जत तालुका प्रतिनिधी मारुती मदने, सरपंच भीमराव गंगणे, चेअरमन काशिनाथ करांडे, आनंदराव क्षिरसागर, दैनिक जनमतचे पत्रकार संजय कांबळे, सखाराम घुटुकडे, कुमार काळे, चंद्रकांत घुटुकडे, रामचंद्र पाटील, सतीश क्षिरसागर यांच्यासह ग्रामस्थ, खेळाडू आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *