गांजा

गांजा लागवडीची जत पोलिसांना मिळाली होती गोपनीयरित्या माहिती

आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील वज्रवाड येथे सिकंदर आप्पासाहेब जमादार (वय ३८) याच्या उसाच्या शेतीत लागवड केलेली गांजांची रोपे जत पोलिसांच्या पथकाने जप्त केली. त्यांचे वजन एकोणीस किलो आहे. किंमत सुमारे एक लाख ९४ हजार इतकी असून मंगळवारी (ता. ३) सायंकाळी ५ वाजता ही कारवाई करण्यात आली. जत पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड यांनी फिर्याद दिली.

हे देखील वाचा: Murder News : निवृत्त परिचारिकेचा 30 लाखांसाठी खून; जिल्हा परिषदेच्या दोन लिपिकांना अटक

पोलिसांनी सिकंदर जमादारविरोधात गुन्हा दाखल केला असून ताब्यातही घेतले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जत तालुक्यातील वज्रवाड येथे एका शेतकऱ्याच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली आहे.  पोलिस वाहिद मुल्ला यांना गोपनीयरित्या मिळालेल्या माहितीनुसार पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस उपाधीक्षक सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव व पोलिस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड यांच्यासह पोलिसांच्या पथकाने वज्रवाड येथील जमादार यांच्या उसाच्या फडात छापा टाकला. उसाच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याचे आढळून आले.

दरम्यान, जमादार याने बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पंचनामा करत संशयित जमादारला ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस
निरीक्षक बिराप्पा लातुरे अधिक तपास करत आहेत.

हे देखील वाचा: Accident / अपघात : दारुड्याने चालकाला स्टेअरिंगवरून खेचल्याने झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू; 9 वाहनांना ठोकरले

चोरोची येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या व्यक्तीचा मृत्यू

कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची येथे रस्त्याकडेला आजारी अवस्थेत पडलेल्या बेवारस व्यक्तीला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की चोरोची येथे रस्त्याकडेला एक अनोळखी व्यक्ती आजारी अवस्थेत ग्रामस्थांनी पाहिले. त्यावेळी सदाशिव नामदेव
यमगर यांनी सामाजिक आपुलकी दाखववत कवठेमहांकाळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आले होते.

हे देखील वाचा: shocking: बहिणीचा खून: संपत्तीच्या वादातून भाऊ-वहिनीने केला बहिणीचा खून: पुण्यातील खराडीतील प्रकरण

त्याचे उपचारांदरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. निकिता डोमने यांनी पोलिसांना दिली आहे. बेवारस मृतदेहाचे वर्णन अंदाजे (वय ३०), रंगाने सावळा, चेहरा उभट, अंगाने सडपातळ, उंची पाच फूट तीन इंच, टक्कल पडलेले, दाढी वाढलेली, अंगात फुलं बाहीचा तांबूस रंगाचा मळकटलेला अंगरखा, मळकटलेली पँट होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *