जत तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा

जत येथे सन २०२६-२७ मधील तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा उत्साहात पार पडली. बहुशिक्षकी, द्विशिक्षकी आणि तंत्रज्ञानाधारित साहित्य गटातील विजेत्यांचा पारितोषिके देऊन सत्कार.

जत : शिक्षकांच्या कल्पकतेला, सर्जनशीलतेला आणि अध्यापनातील नाविन्यपूर्ण प्रयोगांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील जत तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा मॉडेल स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा क्रमांक १, जत येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत शिक्षकांनी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य सादर करून आपल्या अध्यापन कौशल्याचे दर्शन घडवले.

स्पर्धेचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात आले होते. बहुशिक्षकी शाळा, द्विशिक्षकी शाळा आणि तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक साहित्य अशा विविध गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

जत तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा

बहुशिक्षकी शाळा गटातील विजेते

बहुशिक्षकी शाळा गटात श्रीकांत शंकर सोनार (काराजनगी) यांनी प्रथम, रिहाना नदाफ यांनी द्वितीय, तर मिनिता पाटील (सिद्धनाथ) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

उत्तेजनार्थ क्रमांकांमध्ये भगवान बाबासो हिप्परकर यांनी प्रथम, वर्षा सुभाष शिंदे यांनी द्वितीय, तर कृष्णराव रावसाहेब यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

द्विशिक्षकी शाळा गटातील विजेते

द्विशिक्षकी शाळा गटात विजयकुमार माळी यांनी प्रथम, अजीम नदाफ यांनी द्वितीय, तर पूजा मिली मिले (चौगुले वस्ती) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

उत्तेजनार्थ क्रमांकांमध्ये अब्दुल सय्यद (घाटगेवाडी), छगन विष्णू गवळी (विजयनगरवाडी), आप्पासाहेब सौदागर आणि रतन खंड पावरा यांनी यश संपादन केले.

तंत्रज्ञानाधारित शैक्षणिक साहित्य गट

तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक साहित्य निर्मिती गटात प्रमोदकुमार संतोष पाटील यांनी प्रथम, बसवराज नंदकोड यांनी द्वितीय, तर विजयकुमार महादेव माळी यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

उत्तेजनार्थ क्रमांकांमध्ये प्यारसिंग रामचंद्र पावरा (सिंदूर) यांनी प्रथम, सूर्यकांत वसंतराव राठोड (वायफळ) यांनी द्वितीय, तर प्रकाश बबनराव बर्डे (पारधी वस्ती, पांडोझरी) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

हेदेखील वाचा: जत तालुक्यात दोन घटना; अपघातात 19 वर्षीय तरुण ठार, उमदीत हाणामारी

परीक्षक व आयोजकांचे योगदान

या स्पर्धेसाठी सोमनाथ कुंभार, रामदास वागदरी, माने, गावित, पट्टणशेट्टी, शहाजी साळुंखे आणि नारायण शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन गटशिक्षणाधिकारी राम फरकांडे यांनी केले, तर शिक्षणविस्तार अधिकारी अन्सार शेख यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विस्ताराधिकारी तानाजी गवारी, विस्ताराधिकारी श्री. वाघमारे, जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ चे वरिष्ठ मुख्याध्यापक संभाजी कोडग, जत कन्या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. बाबर, खोजनवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख शिवशंकर माळी आणि मुचंडी केंद्राचे केंद्रप्रमुख झुंजा यांनी सहकार्य केले.

या वेळी तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेतील सर्व विजेत्यांचा पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या कल्पकतेला व नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांना प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *