सांगली

सारांश: सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विटा येथील एमआयडीसी परिसरात रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीजवर कारवाई करत २९.७३ कोटींच्या मेफेड्रॉन (एम.डी) ड्रग्जसह उत्पादन साहित्य जप्त केले. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, ड्रग्ज निर्मिती व तस्करीला आळा घालण्यासाठी ही मोठी कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कार्यवाही यशस्वी केली. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली

सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातल्या कार्वे गावाजवळ मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर धडक कारवाई करून २९.७३ कोटी रुपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्ज व ते तयार करण्याचे साहित्य जप्त केले. ही कारवाई विटा येथील एमआयडीसी परिसरातील रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज येथे करण्यात आली.

हे देखील वाचा: crime news: चोरीच्या तब्बल 23 मोटारसायकली जप्त: इस्लामपूर पोलिसांची चोरट्यांविरोधातील मोठी कारवाई

कारवाईचा तपशील:
– गुन्हा क्रमांक: ५२/२०२५
– कलम: एनडीपीएस अॅक्ट ८(क), २१(क), २९
– गुन्हा दाखल वेळ व ठिकाण: २७ जानेवारी २०२५, रात्री ७.४५ वाजता
– फिर्यादी: पोलीस हवालदार सागर गिरीजापती टिंगरे

माहितीचा उगम:
पोलीस हवालदार सागर टिंगरे व नागेश खरात यांना गुप्त माहिती मिळाली की, विटा येथील रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीजमध्ये मेफेड्रॉन तयार करून विक्रीसाठी साठवले जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तत्काळ कारवाईसाठी योजना आखली.

मुख्य आरोपी व त्यांचे ठिकाण
– रहुदिप धानजी बोरिचा (वय ४१, भरुच, गुजरात)
– सुलेमान जोहर शेख (वय ३२, बांद्रा, मुंबई)
– बलराज अमर कातारी (वय २४, साळशिंगे रोड आयटीआय कॉलेज जवळ विटा, सांगली)

हे देखील वाचा: मुलांना अभ्यासासाठी फोन देत आहात? त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या सेटिंग्स करा; Learn the 5 settings of Digital Wellbeing settings

यातील रहुदिप बोरिचा हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचे बीएससी केमेस्ट्री शिक्षण झाले असुन त्यास केमीकल प्रॉडक्शन बाबत चांगली माहिती आहे. तसेच गेले सुमारे १ महिन्यापासुन तो, बलराज कातारी व सुलेमान शेख यांनी सदरची रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज ही XYZ रा. पाटील वस्ती, विटा यांचे कार्वे, ता. खानापुर जि. सांगली गावचे हद्दीत असले प्लॉट नंबर ४३ मधील कारखाना त्यांचेकडुन ३०,०००/- रु प्रति महिना देवुन भाडयाने घेतला असुन त्याबाबत त्यांचेत अद्याप कोणताही करार झाला नाही.

त्या ठिकाणी रहुदिप बोरिचा व सुलेमान शेख हे तेथे असणा-या कच्चे मटेरीयलच्या सहायाने मशिन द्वारे सदरचा मेफॉड्रॉन (एमडी) हा माल तयार करीत असतात व तो माल विक्री करीता बलराज कातारी हा बाहेर घेवुन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

संपत्ती व साहित्याचा जप्ती तपशील
एकूण संपत्ती व साहित्याचा जप्त रक्कम: २९,७३,५५,२००/- रुपये
– मेफेड्रॉन (एम.डी.): १०१६ ते १०२४ ग्रॅम वजनाचे १५ साठे
– उत्पादन साहित्य: विविध रसायने व उपकरणे, ज्यात टोलीन, प्रॉपीलिन क्लोराईड, ॲल्युमिनियम क्लोराईड, हायड्रोक्लोरिक अॅसिड इत्यादींचा समावेश
– वाहने: ह्युंडाई आय२० (आरटीओ क्रमांक MH-43-AN-1811)

हे देखील वाचा: घरात येताच का जाणवतो तणाव? वास्तुदोष आहे का याची खात्री करून घ्या; वास्तुदोष सुधारण्यासाठी सामान्य 4 उपाय/ General remedies to correct Vastu defects

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, व अप्पर पोलीस अधीक्षक ऋतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि त्यांच्या चमूने पार पाडली.

गुन्ह्याचा उद्देश व पुढील तपास
सरकारच्या “नशामुक्त भारत” मोहिमेअंतर्गत अमली पदार्थ निर्मिती व तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा आदेश देण्यात आला आहे. या कारवाईतून महाराष्ट्रातील अमली पदार्थांच्या नेटवर्कवर मोठा आघात झाल्याचे दिसते. आरोपींवर एनडीपीएस कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध घेतला जात आहे.

सांगली पोलिसांनी केलेली ही कारवाई अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. या प्रकरणामुळे पोलिसांच्या सतर्कतेचे आणि गुप्तहेर यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *