सांगली

सारांश: सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जबरी चोरी प्रकरणात तीन आरोपींना अटक करून १०,१०,२५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विटा व आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यांची कबुली मिळाली. खानापूर-विटा मार्गावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहे.

सांगली

सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगली जिल्ह्यातील विटा येथील एका जबरी चोरी प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी करत तीन आरोपींना अटक करून दहा लाख १० हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हे देखील वाचा: लष्करात जायचंय? तयारीला लागा! ‘एसपीआय’ची प्रवेश प्रक्रिया सुरू, अंतिम मुदत 28 फेब्रुवारी; 10 वीत असलेल्या तरुणांना संधी; Golden opportunity to join the army

घटनेचा तपशील:
दि. ६ जून २०२४ रोजी रात्री ९ वाजता विटा पोलीस ठाणे हद्दीत एका जबरी चोरीची नोंद झाली. संशयितांनी सोन्याचे दागिने, लॉकेट, ब्रासलेट, तसेच एक मोटारसायकल लंपास केली. यानंतर सांगली पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या नेतृत्वात तपास पथक नेमले.

गुप्त माहिती आणि अटक प्रक्रिया:
दि.२० जानेवारी रोजी मध्यरात्री खानापूर-विटा मार्गावर बळवंत कॉलेजजवळ गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. विनानंबर प्लेट असलेल्या मोटारसायकलवरून येणाऱ्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
संशयितांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
1. अक्षय महादेव माने (२६ वर्षे)
2. साहिल कुंडलिक चव्हाण (२१ वर्षे)
3. सचिन विठ्ठल माने (२३ वर्षे)

हे देखील वाचा: miraj crime news: मिरजमध्ये पोलिसांची मोठी कारवाई: नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक; 14 लाखांहून रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुद्देमाल:
संशयितांच्या अंगझडतीत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
– ९,५०,२५० रुपयांचे सोन्याचे दागिने (ब्रासलेट, चैन, लॉकेट, बोरमाळ)
– ६०,००० रुपयांची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल

उघडकीस आलेले गुन्हे:
तपासादरम्यान विटा आणि आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीचे विविध गुन्हे उघडकीस आले:
– विटा पोलीस ठाणे: गु.र.नं. ३४०/२०२२ व २४३/२०२४
– आटपाडी पोलीस ठाणे: गु.र.नं. ३९५/२०२४

हे देखील वाचा: गाजराचे आरोग्यदायी फायदे: 7 महत्त्वाचे फायदे जाणूनच घ्या / Health Benefits of Carrots

आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली:
अक्षय माने याचे पँटचे खिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले. त्यास सदर मालाबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल हा विटा पोलीस ठाणे हद्दीतील भूड गावातील दुकानातील वयस्कर व्यक्तीचे गळयातील चैन ओढलेला, लेंगरे माघळमुठी रोडला एका वाहन चालकास धक्का देवून गाडीवरून पाडून त्याचे हातातील व गळयातील सोन्याचे दागिने व आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील करगणी गावातील घरातून चोरी केलेले दागिने असल्याची कबुली दिली.

पुढील तपास:
जप्त मुद्देमाल व आरोपी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, पोलीस निरीक्षक सतिश शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी दाखवलेल्या तत्परतेसाठी स्थानिकांनी कौतुक व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *