सारांश: कु. सोमती कोडग हिने लखनऊ येथे पार पडलेल्या ६८ व्या नॅशनल स्कूल गेम्स २०२४ मध्ये १७ वर्षाखालील गटातील ४x४०० मीटर रिले रनिंगमध्ये सुवर्णपदक मिळवले. सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानकडून तिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात तिच्या पालकांसह प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. तीला यावेळी पुढील यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सांगोला, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी ):
सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने ६८ व्या नॅशनल स्कूल गेम २०२४ स्पर्धेत रिले रनिंगमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या कु. सोमती कोडग हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी कु. सोमती कोडग हिचे आ-वडील उपस्थित होते.
सांगोला तालुक्यातील आलेगाव येथील रहिवाशी व सध्या नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक असलेले रामचंद्र कोडग यांची कन्या कु. सोमती कोडग हिने ६८ व्या नॅशनल स्कूल गेम २०२४ मध्ये (१७ वर्षाखालील) स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे २५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये कोडग आणि महाराष्ट्र टीम ने ४x ४०० मीटर रिले रनिंग (धावणे) मध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याबद्दल आपुलकी प्रतिष्ठानकडून सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी वडील रामचंद्र कोडग, आई सौ. विद्या कोडग, आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, अजयकुमार बाबर, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी, अरविंद डोंबे, अरविंद केदार, राहुल टकले, दीपक शिनगारे, चंद्रशेखर कवडे, दादा खडतरे, सोमनाथ माळी, महादेव दिवटे,सोमनाथ सपाटे, संतोष भोसले, अच्युत फुले, रविंद्र कदम, निलकंठ लिंगे,अतुल वाघमोडे आदी उपस्थित होते.