सांगली

* जत येथे अल्पवयीन मुलीशी विवाह करून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल *शेगावात ३४ हजारांची वीजचोरी एकाविरुद्ध गुन्हा दाखल *हद्दपारीचा भंग; एकाविरुद्ध गुन्हा

 अल्पवयीन मुलीशी विवाह करून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल

जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जत येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह करून तिच्यावर लैंगिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी, पिडीत मुलगी बाळंत होऊन तिला मुलगी झाल्यानंतर पाच जणांविरोधात जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जत
एआय निर्मित प्रतिमा

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 64, 64(2)(m), लैंगिक अपराधांपासून बालकांचे प्रतिबंध अधिनियम, 2012 चे कलम 4, 6, 8, 12 आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 चे कलम 9, 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Big decision for students/ नापास विद्यार्थ्यांसाठी निर्णय: इयत्ता 5वी आणि 8वीमध्ये नापास विद्यार्थ्यांना मिळणार एक संधी: जाणून घ्या नवे नियम

या गुन्ह्यात खालील व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे: पती: अविनाश संभाजी गडदे, सासरे: संभाजी वसंत गडदे, सासू: शोभा संभाजी गडदे (सर्व रा. विठ्ठल नगर तंगडी मळा, जत), तसेच आई-वडील.

आरोपी सासरे संभाजी वसंत गडदे, सासू शोभा संभाजी गडदे आणि पिडीतेचे आई-वडील यांनी पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिचे लग्न आरोपी अविनाश संभाजी गडदे यांच्याशी लावून दिले, असा आरोप आहे. विवाहानंतर, आरोपी पतीने पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही  सासरी तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि तिला गर्भवती केले. दिनांक १७ डिसेंबर रोजी रात्री ११:४५ वाजता पिडीतेची बाळंतपण होऊन तिला मुलगी झाली.

कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात पिडीत मुलीचा जबाब नोंदवण्यात आला होता. तो जबाब मिळाल्यानंतर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) जाधव करत आहेत.

हे देखील वाचा: murder news: सोन्याच्या हव्यासामुळे सालगड्याकडून 52 वर्षीय शेतमालकाचा खून; मृतदेहाचे तुकडे करून शौचालयाच्या खड्ड्यात पुरले

शेगावात ३४ हजारांची वीजचोरी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

 तालुक्यातील शेगाव येथील शिवाजी चंद्रकांत कांबळे यांनी विहुत अधिनियम २००३ चे कलम १३५ प्रमाणे दि. गेली १२ महिन्यापासुन यांचे घराजवळ ३४ हजार ९३० रुपयांची वीजेची चोरी केल्या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जत

याप्रकरणी सहाय्यक अभियंता सचिन मनोहर माने शाखा कार्यालय शेगाव यांनी तक्रार दाखल केली आहे. कांबळे यांनी घराजवळील असलेल्या लघुदाब वाहीनीवरील तारांवर थेट आकडा टाकुन बेकायदेशिर कनेक्शनमुळे वीज कंपनीचे ६०५ युनीटची १० हजार ९४० रूपये व तडजोडीची रक्कम २ हजार व कायमस्वरी बंद झालेल्या विदयुत कनेक्शनची थकबाकी २१ हजार ९९० रूपये असे एकुण ३४ हजार ९३० रूपयाचे विज चोरी केली आहे.

हे देखील वाचा: शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषद शाळांची केली अचानक तपासणी; शैक्षणिक गुणवत्ता व सुधारणा यांना प्रोत्साहन; create a new ideal of quality in the field of education

हद्दपारीचा भंग; एकाविरुद्ध गुन्हा

हद्दपारीतील गुन्हेगार राहुल उर्फ बंडा शिवाजी वाघमारे (रा. निगडी कॉर्नर ता.जत) हा काल जत बंद व मोर्चात सहभागी झाल्याबद्दल त्याच्याविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघमारे यास तीन महिन्यांपूर्वी निवडणुक काळात हद्दपार करण्यात आले होते.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १४२ प्रमाणे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हद्दपार राहुल उर्फ बंडा शिवाजी वाघमारे हा शहरात काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये कोणत्याही सक्षम अधिका-याची लेखी परवानगी न घेता सहभागी झालेला मिळुन आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई विनोद अशोक सकटे यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *