जुगार

जतच्या उपाधीक्षक कार्यालयाच्या पथकाने कारवाई

आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील मुचंडी येथून कोट्टलगीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्डयावर पोलिसांच्या जतच्या उपाधीक्षक कार्यालयाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

जत

जुगार अड्ड्यावर करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी दोन लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी (ता. ७) रात्री ८.३० च्या सुमारास कारवाई करण्यात आली.  पोलिस ठाण्यात उपाधीक्षक कार्यालयाकडील कर्मचारी नवनाथ अर्जुन करांडे यांनी फिर्याद दिली.

हे देखील वाचा: Triple Homicide/ तिहेरी हत्याकांड: पती, पत्नी व लहान मुलाची हत्या; हत्या झालेली विवाहित महिला 7 महिन्यांची गरोदर

पोलिसांनी गणेश रावसाहेब संकपाळ ( वय २९), देवेंद्र सुरेश कांबळे (२९, गुंडेवाडी, ता. अथणी), सुनील गोपाल कांबळे (३५, कागवाड, ता. अथणी), तुषार अशोक कांबळे (२६, मंगसुळी, ता. अथणी), अक्षय अशोक कांबळे (३०, सिद्धार्थनगर, ता. अथणी), प्रेम बसवराज मलाडी (३१, बेडकमगल्ली, अथणी), अनिल रामू बडकमरी (२८ जत रस्ता, अथणी) व सुनील भीमराव वास्टर (४०, उमराणी रोड, जत), अशा आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शनिवारी सायंकाळी सीमा भागात उपाधीक्षक कार्यलयाचे पथक गस्त घालत असताना मुचंडीहून कोट्टलगीकडे जाणाऱ्या सोनाई हॉटेलच्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यावर पोलिसांनी कारवाई करत संशयितांकडून तीन पानी पत्त्याचा जुगार खेळत असताना ८३ हजार ४०० रोख रक्कम, पत्त्याच्या दोन कॅटसह व जुगार खेळण्यासाठी वापरलेले २ लाख रुपये किमतीची चारचाकी वाहने असा एकूण २ लाख ८३ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा: शासनाचे योजनादूत व्हा, दरमहा 10 हजार मिळवा: 13 सप्टेंबरपर्यंतच ऑनलाइन नोंदणी : प्रत्येक गावात संधी;राज्यभरात ५० हजार ‘योजनादूत’ नेमले जाणार

जत

 वाईन दुकानाच्या मालकासह दोघांवर गुन्हा

 शहरातील एका वाईन दुकानातून बेकायदेशीर, बिगरपरवाना दुचाकीवरून दारूची वाहतूक करत असलेल्या दोघांवर जत पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये विविध कंपन्यांची दारू व बीअर असा ३९ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

शनिवारी (ता. ७) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सातारा रोडवर जनावर बाजारासमोर ही कारवाई करण्यात आली. याबाबत जत पोलिसांत पोलिस शिपाई नवनाथ करांडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संबंधित वाईन दुकानाचा मालक हणमंत सोलनकर (शेगाव, ता. जत) व सलीम रसूल शेख (मोरे कॉलनी, जत) यांच्याविरोधात
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा: surprising : काय म्हणता! रक्तातील पेशींची वाढ करण्यासाठी पेरू हे किवीपेक्षा अधिक प्रभावी? काय कारण आहे जाणून घ्या; महागड्या किवीपेक्षा स्वस्तातल्या पेरूचा आहारात समावेश करा

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रात्री उशिरा एका वाईन दुकानातील ३९ हजार २४० रुपये किमतीचा माल त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या बीअरच्या ३६ बाटल्या, वेगवेगळ्या कंपन्यांच्या ६ बाटल्या, दुचाकी (एमएच १०, डी एन ७२२८) वरून तीन वायरच्या पिशव्या गाडीला अडकवून बेकायदेशीररीत्या सातारा रोडवरून वाहतूक करत असताना आढळून आला.

यावर पोलिसांनी त्याची झाडाझडती केल्यानंतर विना परवानगी संबंधित वाईन दुकानातून माल घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *