सांगली

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे

आयर्विन टाइम्स / सांगली
जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी रविवार ४ ऑगस्ट रोजी सांगलीत आक्रोश छत्री मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विविध संवर्गातील ३५ संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सांगलीत शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली. प्राथमिक शिक्षकांनी मोठया संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व शिक्षक बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी केले.

विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरूवात होईल. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. नवीन पेन्शन योजनेत काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना अत्यल्प सेवानिवृत्ती वेतन मिळत आहेत. यामध्ये उदरनिर्वाह करणे शक्य नाही. सरकारने वेळोवेळी जुनी पेन्शन देण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्याप ठोस निर्णय घेतला नाही.

सांगली

राज्यसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे हा राज्य शासनाच्या हातातील विषय आहे. सहा राज्यात. जुनी पेन्शन योजना आहे. त्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. यामुळे येथील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर सुरक्षितता देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली.

हे देखील वाचा: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राजकीय स्वार्थासाठी; हायकोर्टात जनहित याचिका ; 6 ऑगस्टला सुनावणी

या संघटनांचा आहे आक्रोश मोर्चाला पाठिंबा

सांगली जिल्हा परिषद कर्मचारी संघटना समन्वय समिती, कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षण संस्था चालक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, आरोग्य कर्मचारी संघटना, मुख्याध्यापक संघ सांगली, ग्रामसेवक युनियन (डी. एन. ए. १३२), महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, लिपिक वर्गीय संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, जिल्हा परिषद नर्सेस संघटना, प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटना, औषध निर्माण अधिकारी संघटना, खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ, जिल्हा परिषद अभियंता संघटना, शिक्षक भारती, उर्दू शिक्षक भारती, मागासवर्गीय शिक्षक संघटना, बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, पदवीधर शिक्षक संघटना यासह विविध संघटनांनी मोर्चास पाठिंबा दिल्याची माहिती देण्यात आली.

सांगली

सांगली येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चामध्ये शिक्षक समितीचा सहभाग

शिक्षक समिती जुनी पेन्शन मोर्चात सहभागी होणार सांगलीत रविवार चार ऑगस्ट रोजी सांगली येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चामध्ये शिक्षक समितीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी शिक्षक मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभाग घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील व सरचिटणीस हरिभाऊ गावडे यांनी दिली. एक नोव्हेंबर २००५ पासून सेवेत आलेले सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित संस्थातील कर्मचारी शिक्षकांना १९८२ ची जुनी पेन्शन आणि १९८४ ची भविष्य निर्वाह निधी योजना लागू होणे हा आपला हक्क आहे.

हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 3 ऑगस्ट: मेष, वृषभ यांसह 3 राशींना नशिबाची साथ मिळेल, आर्थिक लाभ, इतरांनी देखील आजच्या राशीत तुमचे भविष्य जाणून घ्या

मात्र ३१ ऑक्टोबर २००५च्या शासन निर्णयाने बंद झालेली जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्याची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यासाठी संघर्ष थांबवणे योग्य ठरणार नाही, अशी शिक्षक समितीची ठाम भूमिका आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठीच्या कोणत्याही आंदोलनापासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती बाजूला राहू शकत नाही असा निर्णय (चांदवड) नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्यकार्यकारिणी सभेत घेण्यात आला. याबाबतची माहिती राज्यकार्याध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी जिल्हा कार्यकारणी मध्ये दिली.

सांगली

या बैठकीला अमोल शिंदे दत्तात्रश शिंदे, विनायक शिंदे, अविनाश गुरव, अरविंद गावडे, सागर बाबर, माणिक पाटील, संतोष वीर, संजय थोरवे, विनायक जाधव, अमेय जंगम, रतन कुंभार, दीपक बनसोडे, सागर खाडे, स्वप्निल मंडले, नेताजी भोसले, राजकुमार भोसले उपस्थित होते.

हे देखील वाचा: जत तालुक्यातील गुड्डापूर येथे 9 कोटी खर्चून कर्नाटक सरकारने उभारले कर्नाटक भवन; माजी मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांच्या हस्ते झाले उद्घाटन; अन्नछत्राचीही उभारणी

याशिवाय शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सदाशिव पाटील, शिवाजीराव पवार, यु.टी. जाधव, शशिकांत बजबळे, बाबासाहेब लाड, विष्णुपंत रोकडे, प्रमोद कोडग, उद्धवजी शिंदे, सचिन देठे, सुनील गुरव, सतीश पाटील,महादेव माळी, विनोदकुमार पाटील, सुधाकर वसगडे, राहुल कोळी, महिला आघाडी अध्यक्षा सुनिता चौगुले, अंजली कमाने, अर्चना खटावकर, राजेंद्र कोळी, दादासाहेब बंडगर, महादेव जंगम, रमेश पाटील, प्रताप सावंत, तानाजी देशमुख, संजय शिंदे, विकास चौगुले, संजय शिंदे, संजय कबीर, प्रदीप मोकाशी, युवराज कोळेकर, राजेंद्र कांबळे, संजय रोकडे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *