जतच्या जिल्हा परिषद मॉडेल स्कूलने

सांगली जिल्हास्तरीय लहान गट एकांकिका स्पर्धेत जतच्या जिल्हा परिषद मॉडेल स्कूल क्रमांक १ ने पटकावला द्वितीय क्रमांक; विद्यार्थ्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक.

जत : जिल्हास्तरीय लहान गट एकांकिका स्पर्धेत जत येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल क्रमांक १ ने द्वितीय क्रमांक पटकावला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरावर शाळेचा नावलौकिक वाढविला.

जत येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल क्रमांक १ ही शाळा विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असते. यंदाही तालुकास्तरावरील विविध शालेय स्पर्धांमध्ये यश मिळवल्यानंतर शाळेने जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेत आपली छाप पाडली. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जतच्या जिल्हा परिषद मॉडेल स्कूलने

या यशासाठी गटशिक्षणाधिकारी राम फरकांडे, विस्तार अधिकारी अन्सार शेख, तानाजी गवारी व वाघमारे तसेच केंद्रप्रमुख सुनील बाबर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक संभाजी कोडग यांनी विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

हेदेखील वाचा : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढा; शिक्षक भारतीची मागणी

एकांकिका स्पर्धेसाठी संगीता बटुळे, सुजाता कुलकर्णी आणि सौ. माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक शहाजी साळुंखे, आशा हावळे, इरसिदप्पा किट्टद, विष्णू फोंडे, विशाखा सावंत, रेवती कुंभार, ज्योती भोसले, किशोर घुगे, स्मिता कुलकर्णी, हेमा तांबडे, प्रिया कोरे, सौ. जाधव आणि हणमंत मुंजे यांचे सहकार्य लाभले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय देवकर, उपाध्यक्ष रोहिणी जाधव आणि समितीच्या सर्व सदस्यांनीही या यशासाठी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे शैक्षणिक वर्तुळातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *