डॉ. व्ही. शांताराम 125 वी जयंती

✨चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे वर्षभर विविध कार्यक्रम. आशियाई चित्रपट महोत्सवात विशेष विभाग आणि गोवा महोत्सवात ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’चे प्रेक्षण. संपूर्ण माहिती वाचा.  ✨

मुंबई,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण करत ‘अयोध्येचा राजा’, ‘माणूस’, ‘कुंकू’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’, ‘दो आँखे बारा हाथ’, ‘नवरंग’, ‘पिंजरा’ यांसारखे अमर चित्रपट देणारे चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांचे १२५वे जयंती वर्ष १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होत आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तब्बल ९२ चित्रपटांची निर्मिती, ५५ चित्रपटांचे दिग्दर्शन आणि २५ चित्रपटांत अभिनय असा अविश्वसनीय कलात्मक प्रवास करणाऱ्या शांतारामांचे जयंती वर्ष राज्यात भव्यपणे साजरे होणार आहे.

डॉ. व्ही. शांताराम 125 वी जयंती


कोल्हापूर-पुणे-मुंबई येथे वर्षभर कार्यक्रम

डॉ. शांताराम यांची सुवर्णकाळाची कारकीर्द जिथे उजळली त्या कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या तीन प्रमुख सांस्कृतिक केंद्रांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.
चित्रपट दालन, व्याख्यानमाला, चित्रपट प्रेक्षण, स्मृतीव्याख्याने, कार्यशाळा अशा अनेक उपक्रमांची आखणी करण्यात येत आहे.

हेदेखील वाचा: Inspiring story on screen: ‘ऊत’ चित्रपटाचा शानदार ट्रेलर लाँच — जिद्दी युवकाच्या संघर्षमय प्रवासाची हळवी कथा 21 नोव्हेंबरला चित्रपटगृहात


आशियाई चित्रपट महोत्सवात खास विभाग

मुंबई आणि ठाणे येथे जानेवारीत होणाऱ्या आशियाई चित्रपट महोत्सवात डॉ. शांता-राम यांच्या चित्रसृष्टीचा विशेष विभाग ठेवण्यात येणार आहे.
त्याचबरोबर प्रभात चित्र मंडळ आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया यांच्या वतीने शांताराम यांच्या क्लासिक चित्रपटांचे विशेष शो आयोजित केले जाणार आहेत.

डॉ. व्ही. शांताराम 125 वी जयंती


गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘डॉ. कोटनीस…’

१२५व्या जयंती वर्षाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डॉ. शांताराम निर्मित ‘डॉक्टर कोटनीस की अमर कहानी’ (१९४६) या ऐतिहासिक चित्रपटाचे विशेष प्रेक्षण होणार आहे.
महोत्सवाच्या सांगता समारंभात डॉ. शांताराम यांच्या चित्राचे विशेष पोस्ट स्टॅम्पचे अनावरण करून त्यांना अभिवादन केले जाणार आहे.


भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेला अमर ठेवा

डॉ. शांताराम यांची चित्रकला, संगीत, रंगछटा आणि नवोन्मेषी कथनशैली यामुळे भारतीय सिनेमाला जागतिक पातळीवर वेगळी ओळख मिळाली.
१२५व्या जयंती वर्षाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती, कार्य आणि योगदानाला पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *