दादा भुसे

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. देवारपाडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत महेश शिंदे या विद्यार्थ्याच्या बेंचवर बसून त्याच्याशी संवाद साधला.

नाशिक, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
शालेय शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारणा आणि शाळांमधील कामकाजाची तपासणी करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांची अचानक तपासणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षकांच्या अध्यापनाची पाहणी केली आणि शाळांमधील समस्या समजून घेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक उपाययोजना सुचवल्या.

दादा भुसे

देवारपाडे शाळेत विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याची चाचणी
दादा भुसे यांनी देवारपाडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गाला भेट दिली. विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य तपासण्यासाठी त्यांनी मराठी आणि इंग्रजी विषयाच्या कवितांचे सादरीकरण घेतले. विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठांवर आधारित प्रश्न विचारून त्यांची आकलन क्षमता तपासली. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षकांना हजेरीपट व शाळेच्या इतर प्रक्रियांबाबत सूचना दिल्या.

हे देखील वाचा: Big decision for students/ नापास विद्यार्थ्यांसाठी निर्णय: इयत्ता 5वी आणि 8वीमध्ये नापास विद्यार्थ्यांना मिळणार एक संधी: जाणून घ्या नवे नियम

विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद
गुगुळवाड शाळेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि आरोग्यविषयक बाबींसाठी प्रश्न विचारले. देवारपाडे शाळेत महेश शिंदे नावाच्या विद्यार्थ्याच्या बेंचवर बसून त्यांनी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या स्वच्छता आणि आरोग्य तपासणी केली. स्वच्छता व आरोग्याच्या बाबतीत शिक्षकांकडून घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली आणि सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

लोकसहभागातून शैक्षणिक सुधारणा
मालेगाव तालुक्यातील शाळांमध्ये लोकसहभागातून शैक्षणिक चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला आहे. राज्यातील इंग्रजी माध्यम शाळांमधील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळविण्यासाठी शिक्षक संघटना, अधिकाऱ्यांशी समन्वय साधून एकत्रितपणे काम करण्याची योजना त्यांनी ग्रामस्थांना सांगितली.

हे देखील वाचा: nashik crime news: नाशिक: प्रेमप्रकरणातून शिक्षिकेची हत्या: 32 वर्षीय आरोपीस जन्मठेप

दादा भुसे

शाळांच्या गरजांची पाहणी
भिलकोट, साजवहाळ, चिखल ओहोळ येथील शाळांना भेट देऊन त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसोबत चर्चा केली. शाळांच्या पायाभूत सुविधांची गरज समजून घेत त्यांनी त्या सोडवण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचा निर्धार व्यक्त केला.

हे देखील वाचा: महाराष्ट्र मंत्रिमंडळ: फडणवीस यांच्याकडे गृह, शिदे नगरविकास, अजित पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालय; महायुतीचे अखेर 8 दिवसांनंतर खाते वाटप जाहीर; जाणून घ्या कोणाला मिळाले कोणते खाते…

सकारात्मक बदलांचा संदेश
शाळांच्या स्वच्छता आणि शैक्षणिक वातावरणात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संदेश देत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या दौऱ्याद्वारे शाळांच्या शैक्षणिक व्यवस्थापनात सुधारणा करण्याचा ठोस प्रयत्न केला आहे. चिखल ओहोळ येथील कर्मवीर नारायण सर्जेराव देशमुख विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंत्री महोदयांचे स्वागत करून आपल्या आनंदाची अभिव्यक्ती केली.

या दौऱ्याद्वारे दादा भुसे यांनी शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेचा नवा आदर्श निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नवा आत्मविश्वास मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *