इस्पुर्ली आणि मिरज परिसरात झालेल्या घरफोड्यांमध्ये सहभाग
कोल्हापूर,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
आर्थिक अडचणींमुळे गुन्हेगारीच्या वाटेवर गेलेल्या एका डॉक्टरसह चार जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. इस्पुर्ली आणि मिरज परिसरात झालेल्या घरफोड्यांमध्ये सहभाग असल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी या टोळीला गजाआड केले.
अटक करण्यात आलेले संशयित:
– डॉ. संजय मधुकर पोळ (४७), दिंडी वेस, मिरज जि.सांगली
– गुरुदत्त शांतिनाथ पोळ (४३), जवाहरनगर, कोल्हापूर
– हरीश मधुकर पोळ (३८), जवाहरनगर, कोल्हापूर
– **स्वप्नील सुरेश सातपुते (३९), यादवनगर, कोल्हापूर
घरफोडीतील मुद्देमाल:
पोलिसांनी या टोळीच्या ताब्यातून साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात तीन तोळे सोने, १९० ग्रॅम चांदी, दोन मोटारसायकली आणि घरफोडीसाठी वापरण्यात आलेली साहित्ये यांचा समावेश आहे.
कर्जबाजारीपणातून गुन्हेगारीकडे वळलेला डॉक्टर
संशयित डॉ. संजय पोळ हा मिरजेत वैद्यकीय व्यवसाय करीत होता. मात्र, सावकारी कर्ज आणि आर्थिक ताणामुळे त्याला दवाखाना बंद करावा लागला. मागील सहा महिन्यांपासून बेकार झालेला डॉ. पोळ, गुरुदत्त पोळ आणि स्वप्नील सातपुतेसोबत घरफोड्यांमध्ये सहभागी झाला.
पोलिस कारवाईचा तपशील
स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार खंडेराव कोळी आणि नवनाथ कदम यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कळंबा आणि कात्यायनी मंदिर परिसरात दोन पथकांनी संशयितांवर छापा टाकला. शनिवारी रात्री चारही संशयितांना अटक करण्यात आली. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यात चोरीचे दागिने आणि इतर साहित्य सापडले.
गुन्हेगारीचा इतिहास
गुरुदत्त पोळ आणि स्वप्नील पोळ हे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर अनुक्रमे ५० आणि २२ गुन्हे नोंद आहेत. गांजा विक्री, चोरी आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.
गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता
टोळीने जिल्ह्यात इतर काही ठिकाणीही घरफोड्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यांचा आणखी गुन्हेगारी कारवायांचा मागोवा घेतला जात आहे.
पोलिसांचे कौतुक
या कामगिरीबद्दल पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाचे कौतुक होत आहे. त्यांनी घडलेल्या घरफोड्यांचा तपशील मिळवत चातुर्याने संशयितांना गजाआड केले.
नागरिकांनी सतर्क राहावे
घरफोडीच्या घटना वाढल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.