क्राईम / रहस्यमय स्टोरी

दोन लिपिकांनी गोड बोलून सोबत नेले व कारमध्ये खून केला

आयर्विन टाइम्स / जळगाव
जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील निवृत्त परिचारिका स्नेहलता अनंत चुंबळे (वय ६०) यांना मिळालेली ३० लाखांची रक्कम लाटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या दोन लिपिकांनी गोड बोलून सोबत नेले व कारमध्ये त्यांची हत्या केली. जिजाबराव पाटील (वय ४८, रा. मुंदडानगर, अमळनेर) व विजय रंगराव निकम (वय ४६) यांना अटक करण्यात आली आहे.

खून जळगाव

स्नेहलता चुंबळे एप्रिल २०२३ मध्ये साळवा नांदेड (ता. धरणगाव) येथून निवृत्त झाल्या होत्या. १७ ला स्नेहलता मुलगा समीर याच्यासह नाशिकहून जळगावला आल्या होत्या. २० ऑगस्टला त्या रात्री अकराच्या रेल्वेने नाशिकला परत येणार असल्याचे त्यांनी पती संजय देशमुख यांना फोन करून सांगितले होते. मात्र, त्या पोहोचल्या नाहीत. २१ ऑगस्टला मुलगा समीर आणि पती संजय यांनी त्यांचा शोध घेतला, परंतु त्यांना काहीही माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा: Accident / अपघात : दारुड्याने चालकाला स्टेअरिंगवरून खेचल्याने झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू; 9 वाहनांना ठोकरले

पोलिसी खाक्या दाखविताच दोघांनी दिली गुन्ह्याची कबुली

स्नेहलता यांनी नाशिकला प्लॉट घेण्यासाठी स्टेट बँकेतून ३० लाख रुपये काढले. त्यांच्यासोबत काम करणारा जिजाबराव पाटील असल्याची माहिती स्नेहलता यांची मुलगी मयुरी देशमुख हिला चांदसर येथील मामा सुनील शिंदे यांनी दिली. ही माहिती कुटुंबीयांनी दिल्याने गुन्हे शाखेने तपासाला गती दिली. गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे कर्मचारी जिजाबराव पाटील (वय ४८, रा. मुंदडानगर, अमळनेर) व विजय रंगराव निकम (वय ४६) यांना ताब्यात घेत विचारपूस केली, मात्र सुरवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

हे देखील वाचा: shocking: बहिणीचा खून: संपत्तीच्या वादातून भाऊ-वहिनीने केला बहिणीचा खून: पुण्यातील खराडीतील प्रकरण

पोलिसांनी त्यांचा पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना रात्री अकराला अटक करण्यात आली. मृत स्नेहलता यांचा मुलगा समीर यांनी पोलिसात तक्रार दिली त्यानुसार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कारमध्ये केला गळा आवळून खून

स्नेहलता चुंबळे जळगावला ग. स. सोसायटीच्या बैठकीला आल्या असताना, जिजाबराव पाटील व विजय निकम यांची भेट झाली. प्लॉट घेण्यासाठी पैसे काढायचे असल्याचे सांगितल्याने जिजाबराव त्यांच्यासोबत गेला. पैसे काढून स्नेहलता यांना कारमध्ये घेऊन जात असताना, गाडीतच त्यांचा गळा आवळून खून केला व मृतदेहाची अज्ञातस्थळी विल्हेवाट लावली.

हे देखील वाचा: Shocking: विवाहितेची 4 वर्षीय मुलासह आत्महत्या; सासू व नवरा यांच्याकडून अश्विनीचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप

संशयित जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी

जिजाबराव पाटील व विजय निकम जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत. दोघांव्यतिरिक्त या गुन्ह्यात इतरही सहभागी आहेत का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *