अपघात: नऊ जखमींपैकी आणखी एक महिला गंभीर जखमी
आयर्विन टाइम्स / मुंबई
बेस्टची क्रमांक ६६ वरील बस रविवारी रात्री लालबागमधून जात असताना एका दारुड्या प्रवाशाने गाडी थांबवण्यावरून झालेल्या वादात बसचालकाला स्टेअरिंग- वरून खेचले. यात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बसने ९ वाहनांना धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या दोन महिलांपैकी एकीचा रुग्णालयात मृत्यू झाला.
ही विचित्र घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती. त्यावेळी बस गणेश सिनेमागृहाजवळ होती. काळाकिल्ला आगारातील बस कंपनीकडून ओलेक्ट्रा भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. भाटिया बाग येथून ही बस राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात होती.
बस थांबवण्यावरून दारुड्या प्रवाशी व चालकात झटापट
गणेश सिनेमागृहाजवळ बस आल्यावर दारुड्या प्रवाशाने बसचालकाला बस थांबवण्याची विनंती केली. चालकाने बस थांबवण्यास नकार दिला. बस थांबवण्यावरून बेस्ट चालक व मद्यपी प्रवासी यांच्यात झटापट झाली. या झालेल्या झटापटीत गाडी गर्दीत घुसली चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बसने नंतर ९ दुचाकी वाहने आणि पादचाऱ्यांना धडक दिली.
केईएम रुग्णालयात उपचार्थ जखमींपैकी नुपूर मणियार यांना अतिदक्षता विभागात मृत घोषित करण्यात आले. या अपघातात नऊजण जखमी झाले आहेत. आणखी एका महिला गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले.
नूपुरा मणियार या प्राप्तिकर विभागात अधिकारी होत्या
गंभीर जखमी झालेल्या नूपुरा मणियार या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नूपुरा या प्राप्तिकर विभागातील अधिकारी होत्या. त्या ‘लालबागचा राजा’ मंडळात दरवर्षी स्वयंसेवक म्हणून काम करायच्या. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी आरोपी दत्ता शिंदे याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
लालबागचा गरमखाडा परिसर रविवारी खरेदीसाठी गजबजला होता. अचानक गर्दीत ६६ क्रमांकाची बस घुसली आणि पादचारी तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली. यात खरेदी आणि ‘लालबागचा राजा’ मंडळाचे ओळखपत्र घेण्यासाठी आलेली नूपुरा बस आणि अन्य वाहनाच्या मध्ये अडकून गंभीर जखमी झाली होती. रविवारी रात्री केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आणखी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.
मणियार कुटुंबाचा आधार हरपला
चिंचपोकळी येथील मुक्ताई म्हाडा इमारतीत नूपुरा तिच्या आई आणि बहिणीसोबत राहात होती. वडील सुभाष यांचा कोविड काळात मृत्यू झाला होता. ते आयकर विभागात अधिकारी होते, आणि त्यांच्या जागी नूपुरा रुजू झाली. वडिलांच्या निधनानंतर तीच कुटुंबाचा आधार बनली होती. दिवाळीनंतर तिचा विवाह होणार होता. रविवारी ती आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत लालबाग येथे खरेदीसाठी आली होती.
हे देखील वाचा: murder news: अनैतिक संबंधातून महिलेचा खून: संशयित 28 वर्षीय तरुणानेही घेतला गळफास
बेस्ट बसचा असा झाला अपघात
बेस्ट बस चिंचपोकळी पूल ओलांडून गणेश टॉकीज थांब्याच्या पुढे गेल्यानंतर संत जगनाडे चौकात उतरण्यासाठी आरोपी दत्ता शिंदे याने चालक कमलेश प्रजापती यांना विनंती केली. प्रजापती यांनी त्याला नकार दिला, ज्यामुळे संतापलेल्या शिंदेने प्रजापती यांच्यावर हल्ला केला. या झटापटीत प्रजापती यांचा स्टिअरिंगवरील ताबा सुटला आणि ब्रेकऐवजी त्यांचा पाय एक्सलेटरवर पडला. त्यामुळे बस वेगात डावे वळण घेऊन पुढील अनर्थ घडला. शिंदे हा दारूच्या नशेत होता, असे पोलिसांनी सांगितले.