कवठेमहांकाळ दरोड्यात झटापटीत महिला जखमी
आयर्विन टाइम्स / कवठेमहांकाळ
कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी व केरेवाडी (जि. सांगली ) येथे मध्यरात्रीच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोरांनी तीन घरांवर दरोडा टाकला. दागिन्यांसह रोकड असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लुटला. दरोड्यावेळी घरातील लोकांना मारहाण केली. झटापटीत महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सशस्त्र दरोडा टाकून पोलिसांवर दगडफेक करत पळून निघालेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांनी नाकाबंदी करत पाठलाग केला. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. नरसिंहगाव येथे ही घटना घडली. त्यात एका दरोडेखोरास अटक करण्यात पोलिसांनी यश मिळाले.
लागोपाठ तीन घरांवर टाकला दरोडा
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरेवाडी- केरेवाडी रस्त्यावरील दिगंबर रावसाहेब करे (रा. केरेवाडी) हे कुटुंबासह राहतात. शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या दरोडेखोरांनी घरावर दरोडा घातला. दरोडेखोरांनी घरातील सोने व रोकड लुटली. यात सोन्याचे मणीमंगळसूत्र, टॉप्स, चेन, लॉकेट, कानातील बाळी, रोख दहा हजार व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल याचा समावेश आहे. त्यानंतर दरोडेखोरांनी आरेवाडी येथील विजय शंकर बाबर (आरेवाडी) यांच्या घराला लक्ष्य केले.
घरातील साठ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले, तर शेजारीच राहणाऱ्या हिराबाई दत्तू कोळेकर यांना दरोडेखोरांनी मारहाण केली. घरातील सोन्याचे दागिने रोख केली. घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरून नेली. तिघांच्या घरातील सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला. यावेळी दरोडेखोरांनी कोळेकर यांच्या घरात सात वर्षांच्या मुलाला आतल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत उचलून फेकून दिले. त्यात तो जखमी झाला आहे.
कवठेमहांकाळ दरोड्यात चाकूचा धाक दाखवून लूट
दरम्यान, रात्री साडेबाराच्या सुमारास घरातील वृद्ध महिला श्रीमती बाबर यांना बाहेर पाच जण आल्याचे दिसले. त्यांनी का आला आहे, असे विचारताच दरोडेखोरांनी आम्हाला जेवायला पाहिजे म्हणून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला व घरी झोपलेल्या अनिता बाबर यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. हातावर काठीने हिसकावून घेतले. हातावर काठीने जोरदार मारहाण केली. विजय बाबर यांनाही मारहाण करण्यात आली. दिगंबर करे यांच्या घरीही चाकूचा धाक दाखवून लूट केली. तेथून दरोडेखोरांनी पलायन केले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. याबाबत तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले.
कवठेमहांकाळ दरोड्यात पाठलागानंतर एका दरोडेखोराला पकडण्यात पोलिसांना यश
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी हजर झाले. यावेळी पाच ते सहा दरोडेखोर रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने गेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिरजेचे उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, जतचे उपाधीक्षक सुनील साळुंखे, निरीक्षक जोतिराम पाटील यांनी यांनी दरोडेखोरांचा महामार्गावर पाठलाग केला. यावेळी नरसिंहगाव जवळ दरोडेखोरांनी मोटारसायकली रस्त्यावर टाकून शेतात पलायन केले, मात्र पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरूच ठेवला. या दरम्यान दरोडेखोरांनी पोलिसावर दगडफेक केली. पोलिसावर दगडफेक होत असल्याचे दिसताच उपाधीक्षक गिल्डा यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. पाठलागानंतर एका दरोडेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, झालेल्या या घटनेने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आज सायंकाळी दंडोबा डोंगर परिसरातून आणखी तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती निरीक्षक जोतीराम पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पोलिसांत अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
दरोड्यातील चोरीचा तपशील : आरेवाडी येथील दिगंबर रावसाहेब करे वय २५ वर्षे व्यवसाय ड्रायव्हर सध्या रा. केरेवाडी, नंदेश्वर ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांच्या घरात घुसून जबरीने चोरून नेलेला माल ३०.००० रुपये किंमतीचे एक सोन्याचे मणी मंगळसूत्र अर्धा तोळ्याचे १५,००० रुपये किंमतीचे सोन्याचे कानातील ३ ग्रॅम वजनाचे टॉप्स, १०,००० रुपये किंमतीचे सोन्याचे गळ्यातील २ ग्रॅम वजनाचे ओम असलेले बदाम, ३५००० रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट असलेली ७ ग्रॅम वजनाची चेन, ५००० रुपये किंमतीचे सोन्याची बाळी १ ग्रॅम वजनाची, १०,००० रुपये किंमतीचे चांदीचे १० भार वजनाचे हातातील कडे, १०,००० रुपये किंमतीचे सोन्याचे तसेच चांदीचे लहान बाळाचे दागीने ( सोन्याची मणगटी, मुद्दया, चांदीचे चांदीची हातातील बिंदी), १०,००० रुपये किंमतीचे रोख रक्कम, १०,००० रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला.
त्यानंतर विजय शंकर बाबर रा. आरेवाडी यांचे घरात घुसून चोरट्यांनी चोरी केली, चोरीस गेलेला माल पुढीलप्रमाणे ६०.००० रुपये किमतीचे सोन्याचे १ तोळा वजनाचे मणीमंगळसुत्र त्यानंतर हिराबाई दत्तु कोळेकर रा. आरेवाडी यांचे घरातील चोरीस गेले मालाचे वर्णन ९०,०००रुपये किंमतीचे सोन्याचे गळ्यातील दीड तोळे वजनाचे मणीमंगळसुत्र, ५००० रुपये किंमतीचे चांदीच्या ५ भार वजनाच्या मासोळ्या, ३०,००० रुपये किंमतीचे सोन्याचे कानातील फुले, साखळी, वेल व बुगड्या, २५,००० रुपये
रोख, १५०० रुपये किंमतीचे पितळीचे समई (२) नग १०० रुपये किंमतीचे मेटेलचे अरतीचे ताट फिर्यादी दिगंबर रावसाहेब करे यांचे १,३०,००० किंमतीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल लुटला.
तसेच विजय शंकर बाबर रा आरेवाडी यांचे ६०,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे तसेच त्यांचे शेजारी राहणारे हिराबाई दत्तु कोळेकर यांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम १,५१,६०० रुपये किमतीचा ऐवज असा मुद्देमाल अनोळखी अज्ञात ५ ते ६ चोरट्यांनी दहशत माजवत लंपास केला.
या चोरी नंतर आरोपी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय माहामार्गा वरून पसार झाले, भयभीत नागरिकांनी पोलिसांना वृत्त कळवताच कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील कर्मचाऱ्यांसह त्या दिशेने निघाले, रात्रीच्या गस्तीवर असणारे पोलिसांनी ही चोरट्यांचा माग काढायचा प्रयत्न केला, जत वरून उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे व मिरज चे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा हे सुध्दा तातडीने पोहचले, चोरट्यांचा पाठलाग करताना चोरट्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक चालू केली व त्यांच्याकडील गाड्या रस्त्यावरच टाकून अंधान्या रात्री शेतातून पळू लागले यावेळी स्वसंरक्षणार्थ उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्ड यांनी रिव्हॉल्वर मधून एक राऊंड गोळीबार केला.