शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढा

शिक्षकांची प्रलंबित वैद्यकीय बिले, सेवाजोड, वरिष्ठ व निवडश्रेणी, फंड ना-परतावा आणि नाव बदलाचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची शिक्षक भारतीची मागणी.

जत : शिक्षकांच्या विविध प्रशासकीय, आर्थिक आणि सेवाविषयक प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून संबंधित शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी शिक्षक भारतीच्या जत तालुका शाखेने केली आहे. याबाबत शिक्षणाधिकारी नानासाहेब हजारे यांना निवेदन देण्यात आले.

शिक्षकांनी विविध प्रश्नांबाबत आवश्यक प्रस्ताव आणि कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करूनही अनेक प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षकांना आर्थिक तसेच प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

शिक्षक भारतीने निवेदनात प्रलंबित वैद्यकीय बिले तातडीने मंजूर करावीत, अशी मागणी केली आहे. शिक्ष-कांनी केलेल्या वैद्यकीय खर्चाची बिले प्रलंबित राहिल्याने त्यांच्यावर आर्थिक भार पडत असून, त्यांची बिले मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढा

तसेच सेवाजोडीशी संबंधित प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी, पात्र शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीचे प्रस्ताव निकाली काढणे, शिक्षकांनी सादर केलेले फंडाचे ना-परतावा प्रस्ताव तातडीने मंजूर करणे, तसेच शिक्षकांच्या नावातील बदलासंदर्भातील प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी देऊन सेवापुस्तक व संबंधित अभिलेखांमध्ये आवश्यक दुरुस्ती करणे, या मागण्याही करण्यात आल्या.

हेदेखील वाचा : जतमध्ये 43 वा श्री अंबिका नवरात्रोत्सव; 11 ते 26 ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम

शिक्षकांचे हे प्रश्न त्यांच्या आर्थिक, प्रशासकीय आणि सेवाविषयक हक्कांशी संबंधित असल्याने प्रशासनाने त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी. प्रलंबित प्रस्तावांवर विनाकारण विलंब न करता निश्चित कालावधीत कार्यवाही करून शिक्ष-कांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिक्षक भारतीने केली.

प्रशासनाने शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन प्रलंबित प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी शिक्षक भारतीचे जत तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत, अविनाश सुतार आणि प्रवीण राठोड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *