जत नगरपरिषद निवडणूक 2025

जत नगरपरिषद निवडणूक 2025 साठी राष्ट्रवादी अजितदादा पवार गट, ठाकरे शिवसेना आणि बसपा आघाडीने चिनगीबाबा दरग्यातून प्रचाराची सुरुवात केली. प्रभागनिहाय उमेदवारांची यादी जाहीर; विलासराव जगताप आणि सुरेश शिंदे यांच्या जोरदार भाषणांनी वातावरण तापले.

जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जत नगरपरिषद निवडणूक 2025 ला आता उधाण येऊ लागले असून राजकीय वातावरण तापले आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी नगराध्यक्षपदासह 11 प्रभागांतील 23 नगरसेवक पदांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट), यू. बो. टी. पक्ष आणि ब. स. पा. यांच्या संयुक्त आघाडीने शनिवारी भव्य शक्तीप्रदर्शन करत प्रचाराची दणदणीत सुरुवात केली.

जत नगरपरिषद निवडणूक 2025

चिनगीबाबा दरग्यावरून प्रचाराची सुरुवात

जत शहराचे ग्रामदैवत सुफीसंत अवलिया चिनगीबाबा दरग्यात श्रीफळ वाढवून आणि आशीर्वाद घेत प्रचार रॅलीची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी माजी आमदार विलासराव जगताप, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार, तसेच शशिकांत काळगी, शरणाप्पा अक्की, मच्छिंद्र वाघमोडे, बाजी केंगार, प्रकाश देवकुळे, सुभाष बिराजदार, प्रताप शिंदे यांसह आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

आघाडीचे प्रभागनिहाय उमेदवार जाहीर

प्रभाग 1 – योगेश कांबळे, मेघा देवकर
प्रभाग 2 – इंजी. शरणाप्पा अक्की, गौरी पाटील
प्रभाग 3 – सागर चंपन्नावर, हेमा चव्हाण
प्रभाग 4 – संतोष साबळे, तस्मिन जमादार
प्रभाग 5 – इम्रान गवंडी, सारिका एडके
प्रभाग 6 – सचिन मदने, शारदा कणसे
प्रभाग 7 – स्वप्निल शिंदे सरकार, अर्चना केंगार
प्रभाग 8 – प्रा. हेमंत चौगुले, सुवर्णा पाटणकर
प्रभाग 9 – टीमूभाई एडके, रेश्मा नदाफ
प्रभाग 10 – मोहिद्दीन (शफीक) इनामदार, सुवर्णा बामणे
प्रभाग 11 – संग्राम जगताप, मिनाक्षी अक्की, प्राजक्ता शिंदे

शक्तीप्रदर्शनाला रेकॉर्डब्रेक गर्दी

हेदेखील वाचा: जत पोलिसांची मोठी कारवाई: भुषणकुमार साबळे टोळी दोन जिल्ह्यांतून 2 वर्षांसाठी हद्दपार

आघाडीच्या या रॅलीला कार्यकर्त्यांचा आणि समर्थकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. रॅलीदरम्यान नेत्यांनी विरोधकांवर तीव्र टीका करत आगामी निवडणुकीसाठी दमदार भूमिका मांडली.

जत नगरपरिषद निवडणूक 2025


विरोधकांवर विलासराव जगताप यांचा हल्लाबोल

माजी आ. विलासराव जगताप यांनी आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली.
ते म्हणाले:

  • “पडळकर थापा मारण्यात पटाईत आहेत. उमदी येथे 2000 एकर एमआयडीसी उभारण्याचे आश्वासन दिले होते, पण आजपर्यंत जमीन संपादनालाही सुरुवात नाही.”
  • “जतला 400 प्रकारचे प्राणी असलेले प्राणी संग्रहालय आणणार आहोत, अशी नवीन थापा सुरू झाली आहे. पुणे-मुंबईतही इतके प्राणी नाहीत.”
  • “मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर जातिवाद पेरणारे असे वाचाळवीर नेते पोसले जात आहेत.”

तसेच त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांच्यावरही निशाणा साधत विचारले:
“आमदार असताना जतसाठी नक्की काय केले?”


“जत शहराचा विकास आमची प्राथमिकता” – उमेदवार सुरेश शिंदे

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश शिंदे म्हणाले:

  • “उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणू.”
  • “आज जत शहर गुंडगिरी, अवैध धंदे आणि दहशतीला कंटाळले आहे. व्यापारी भयभीत आहेत.”
  • “शहराला गुंडगिरीपासून मुक्त करायचे असेल तर आमच्या पॅनलला विजयी करा.”

निष्कर्ष

आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी आघाडीच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. रॅलीतील जनसमुदाय पाहता आघाडीचे उमेदवार या निवडणुकीत जोरदार लढत देणार हे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *