जत नगरपरिषद निवडणूक 2025

📰 जत नगरपरिषद निवडणूक 2025 साठी सहाव्या दिवशी तब्बल 33 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आतापर्यंत 83 नगरसेवक पदांसाठी आणि 6 नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल. उमेदवारांची संपूर्ण यादी व निवडणुकीतील घडामोडी जाणून घ्या.

जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):

जत नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उत्साह दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी रविवारी तब्बल ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यासह आतापर्यंत ८३ नगरसेवक पदांसाठी तर नगराध्यक्ष पदासाठी ६ अर्ज दाखल झाले आहेत.

निवडणुकीची घोषणा होताच सर्वच राजकीय पातळ्यांवर हालचाली जलद गतीने सुरू असून विविध पक्षांचे संभाव्य उमेदवार आता खुल्या मैदानात उतरले आहेत.

जत नगरपरिषद निवडणूक 2025


📌 रविवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची नावे

रविवारी दाखल झालेल्या उमेदवारांमध्ये विविध समाजघटक व वॉर्डांतील प्रतिनिधींचा समावेश आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:

  • आशिफ महिबुब सय्यद
  • महादेव रामू कोळी
  • प्रमोद सदाशिव हिरवे
  • प्रवीण महादेव कोळी
  • शरणाप्पा तम्माण्णा अक्की
  • वीणा शंकर तंगडी
  • गौरी प्रशांत पाटील
  • धनश्री मनोहर पवार
  • सुभाष कुमार कांबळे
  • संतोष कुमार कांबळे
  • रिजवाना आसिफ मकानदार
  • तस्मिन जिलानी जमादार
  • निलाबाई कृष्णा कोळी
  • सुरेखा महादेव कोळी
  • नजमा अजीज सत्ती
  • अमित बाबुराव दुधाळ
  • मनीषा सचिन माने
  • शारदा अरुण कणसे
  • संजय महादेव शितोळे
  • प्रकाश कृष्णा व्हनमाने
  • नागेश पांडुरंग मदने
  • सुवर्णा दिपक पाटणकर
  • फारूक खुदाबक्ष मुल्ला
  • फिरोज महमदइसक नदाफ
  • सुवर्णा बाळासो बामणे
  • अनुसया प्रकाश माने
  • सुप्रिया स्वप्नील कोळी
  • आकाश मल्लिकार्जुन सगरे

🏛️ निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे

अर्जांची वाढती संख्या पाहता जत नगरपरिषद निवडणूक यंदा अधिकच रंगतदार आणि चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. विविध राजकीय पक्ष, स्थानिक संघटना आणि स्वतंत्र उमेदवार यांची चढाओढ पाहता मतदारांमध्येही निवडणुकीबद्दल चांगलाच उत्साह आहे.

हेदेखील वाचा: जत नगरपरिषद निवडणूक 2025 : संत ज्ञानेश्वर व्याख्यानमालेत मतदार जनजागृती मोहीम राबवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *