सांगली जिल्ह्यातील प्रमुख बातम्या

सांगली,(आयर्विन टाइम्स जिल्हा प्रतिनिधी):
रविवारी सांगली जिल्ह्यात घडलेल्या काही घटनांनी जिल्हावासीयांचे लक्ष वेधून घेतले. मध्यरात्री मिरज शहरात झालेला भीषण अपघात, शेतकऱ्यांसाठी रवाना झालेली विशेष रेल्वे वॅगन, जलजीवन मिशनच्या निधीमुळे मिळालेला दिलासा, आमदार विश्वजीत कदम यांचे समाजाभिमुख कार्य आणि ढालगावमधील आग दुर्घटना — या सर्व घटनांनी दिवस गाजवला.

सांगली जिल्ह्यातील प्रमुख बातम्या

🚗 मिरजमध्ये मध्यरात्री भीषण अपघात : एक ठार, तिघेजण गंभीर जखमी

मिरज शहरात मध्यरात्रीच्या सुमारास अंगावर थरकाप उडवणारा अपघात झाला. सांगली ते मिरज मार्गावरील वंटमुरे कॉर्नर येथे कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात भरदाव कार थेट जाहिरात बोर्डाच्या लोखंडी अँगलला धडकली. या अपघातात सांगलीतील एकजण जागीच ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

विश्वजीत दिलीप नाईक अस मृताच नाव आहे तर ओंकार सुनील पाटील, वैभव नंदकुमार पाटील आणि अनिकेत आशिष कुमामेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. सांगलीतील 100 फुटी परिसरात राहणारे मृत विश्वजीत नाईक हे वैभव कोळी ,ओंकार पाटील आणि अनिकेत या आपल्या मित्रांसोबत अल्टो कार घेऊन सांगलीहून मिरजेकडे निघाले होते आरवट्टगी पेट्रोल पंपा शेजारीच असलेल्या क्रोमा शोरूम जवळ अचानक गाडीच्या आडवा कुत्रा आल्याने कुत्र्याला वाचवण्याच्या नादात अल्टो कार चालकाच नियंत्रण सुटल आणि भरधावपणे समोर असलेल्या जाहिरातीच्या लोखंडी अँगलला जाऊन कार धडकली. धडक इतकी जोराची होती की गाडीचालक विश्वजीत नाईक याचा जागीच मृत्यू झाला.

तर गाडीमध्ये बसलेले तिघे जण गंभीर जखमी झालेत. क्रोमा शोरूम जवळ काही कामगार झोपले असता त्यांना मोठा आवाज झाल्याने ते उठले आणि त्यांना कार खांबाला धडकल्याच दिसलं हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला या अपघाताची माहिती गांधी चौकी पोलीस ठाण्यास मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. अपघातातील जखमींना ताबडतोप उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला.

🚉 सांगली पॅटर्न अंतर्गत शेतकऱ्यांचा माल दिल्लीकडे रवाना

शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळून त्यांना चांगले उत्पन्न मिळावे या हेतूने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 25 टन पेरू, टोमॅटो आणि अंडी नेण्यासाठी एक विशेष वॅगन पहिल्यांदाच जोडण्यात आली आहे. रविवारी पहाटे सव्वा पाच वाजता दर्शन एक्सप्रेस या रेल्वे गाडीने ही वॅगन दिल्लीला पाठवण्यात आली आहे.

मिरज रेल्वे स्थानक येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि समित कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दर्शन एक्सप्रेस रवाना करण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी काकडे यांनी या प्रयत्नामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे आणि रेल्वे विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केलं. शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे कामकाज पूर्ण करता आले नसते. त्यांनी वारंवार पाठपुरावा करून हे काम यशस्वी केल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाचेही आभार मानले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार आणि त्यांचे सर्व अधिकाऱ्यांनी यासाठी मेहनत घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेला आहे.

सांगली जिल्ह्यातील प्रमुख बातम्या

🤝 विश्वजीत कदम यांच्याकडून दोन कोटींची मदत मुख्यमंत्री सहायता निधीस

मानवता हीच जात आणि माणुसकी हाच धर्म हे ब्रीद घेऊन स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांनी आयुष्यभर काम केलं म्हणूनच गोरगरीब आणि दीन दुबळ्यांना ते आधार वाटत होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत विश्वजीत कदम काम करत आहेत. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. राज्यात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र यांसह अनेक राज्यात गेल्या अनेक ठिकाणी काही महिन्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

गेल्या अनेक दशकात असा पाऊस कधीही पडला नव्हता या पावसाने आजवरचे सगळे उच्चांक मोडलेत परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या शेतकरी कष्टकरी कामगार मजूर यांसह सर्वांनाच या पावसाने देशोधडीला लावलं. शेत जमिनी वाहून गेल्या, जनावरे वाहून गेली, दगावली, घरे पडली, घराघरात पाणी वाहू लागलं. इतकी गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली असताना काही प्रमाणात मदतीचे ओघ येऊ लागले.

शासनासोबत काही संस्था, व्यक्ती, संघटना ही मदतीसाठी पुढे येत आहेत, या सगळ्या परिस्थितीत सामाजिक भावनेतून आमदार विश्वजीत कदम यांच्या माध्यमातून अतिवृष्टी आणि पुरामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी भारतीय विद्यापीठाकडून आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम आपत्ती निवारण निधीतून सुमारे दोन कोटींची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी करण्यात आली आहे.

त्याचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी भारतीय विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम, कुलगुरु विवेक सावंत , भारतीय विद्यापीठ आरोग्य विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर अस्मिता जगताप उपस्थित होत्या.

हेदेखील वाचा: sangli crime news: सांगली जिल्ह्यात दोन खून; सांगली शहर आणि तासगाव तालुक्यातील 2 स्वतंत्र घटनांनी खळबळ

💧 जलजीवन मिशनसाठी 15 कोटींचा निधी मंजूर

जलजीवन मिशन योजनेची कोट्यवधी रुपयांची बिले थकीत आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासनाने 699 कोटी रुपये निधी वितरीत केला त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 15 कोटी 69 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय. सहा महिन्यांपासून अनुदानाकडे लक्ष लागलेला ठेकेदारांना काहीसा दिलासा मिळालाय. जिल्ह्यात मागील पाच वर्षांपासून जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत.

जिल्ह्यातील जलजीवन योजनेच्या कामांची थकबाकी सुमारे 60 कोटी रुपयांहून अधिक असून ती मिळावी यासाठी गेल्या वर्षभरापासून ठेकेदारांचा पाठपुरावा सुरू आहे. थकबाकीमुळे प्रचंड आर्थिक कोंडी झालेल्या वाळवा तालुक्यातील एका उपकंत्राटदाराने आत्महत्या केली होती त्यानंतर राज्यभरात ठेकेदारांचा उद्रेक झाला होता. त्यानंतरही शासनाने थकबाकी देण्याच्या हालचाली केल्या नाहीत.

थकीत बिले मिळत नसल्याने ठेकेदारांनी सर्वत्र योजनेची कामे बंद ठेवलीत याची दखल घेत गेल्या आठवड्यात शासनाने 699 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला तो सर्व जिल्हा परिषदांना प्राप्त झाला असून ठेकेदारांचे बिले अदा करण्याच काम सुरू झालय यातून सर्व ठेकेदारांना 100% बिले मिळणार नसली तरी काही प्रमाणात तरी दिलासा मिळालाय सद्यस्थितीत राज्यशासनाकडून निधी वितरीत करण्यात आलाय.

केंद्राचा वाटा अद्याप मिळाला नाही तो आल्यानंतर आणखी काही बिले मिळू शकतील सध्या बिले मिळाली तरी कंत्राटदार कामे पुन्हा सुरू करण्याच्या मनस्थ स्थितीत नाहीत अद्याप मोठ्या प्रमाणात बिले थकेत असल्याने कामांवर खर्च करण्याची त्यांची तयारी नसल्याचे चित्र दिसते.

🔥 ढालगावमध्ये शॉर्टसर्किटमुळे घराला आग : दीड लाखांचे नुकसान

कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथील कमल बापू माने यांच्या घराला रविवारी दुपारी बाराच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागून दीड लाखावर नुकसान झाले, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. ढालगाव -ढालेवाडी रस्त्यावरील कमल बापू माने यांच्या घरी गोपाल सुरेश मायने हे भाड्याने राहत होते मात्र घरातील सर्वजण कामानिमित्त बाहेर पडल्यामुळे घरी कोणीच नव्हते.

दरम्यान बाराच्या सुमारास कमल माने यांच्या घरातून धूर बाहेर येत असल्याचे सचिन सरगर, गोविंद टिंगरे, संजय दळवी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजारी स्वराज निधी लिमिटेड या कर्मचाऱ्यांच्या कानावर घातले. अविराज बोराडे यांनी दरवाजा उघडला तर घरातून आगीच्या ज्वाला दिसल्यावर त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत संसारपयोगी साहित्य, खाक झाले होते.

ही घटना समजतात सरपंच संजय घागरे माजी सभापती विकास हाके यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले. तसेच ग्राम महसूल अधिकारी शंकर वाघमोडे व ग्राम विकास अधिकारी विकास माने यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पंचनाम्यामध्ये एक लाख ५२ हजार ५०० इतके नुकसान झाल्याचे म्हंटले असले तरीही हे नुकसान जास्त आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

रविवारचा दिवस सांगली जिल्ह्यासाठी भावनांच्या विविध छटा घेऊन आला —
एका बाजूला अपघाताने दुःखद घटना घडली, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना बाजारपेठेचा नवा मार्ग खुला झाला. शासनाच्या निधीवाटपामुळे ठेकेदारांना दिलासा मिळाला, आणि समाजसेवेच्या क्षेत्रात विश्वजीत कदम यांनी पुन्हा मानवतेचे उदाहरण घालून दिले.

सांगली जिल्हा अशा घडामोडींमधून विकास, संवेदनशीलता आणि मानवी मूल्यांचा संगम अनुभवत आहे.

Written by Irvine Times Digital Team
Sources: Local reporters, various media outlets

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *