विजेच्या धक्क्याने

आयर्विन टाइम्स
पावसाळा सुरु झाल्या आहे, त्यासरशी विजेचा धक्का लागून जीव गमावण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. बुधवारी दि. ४ जुलै रोजीच सायंकाळच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. शेतात काम करताना विजेचा शॉक लावून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यातील कोपार्डे गावात घडली आहे. कडवी नदीजवळ असणाऱ्या शेतात रोपे लागण करून तणनाशक मारण्यास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा उच्च विद्युत वाहिनी तारेला स्पर्श होऊन दुर्दैवी अंत झाला. शेतात काम करत असताना त्यांचा विजेच्या खांबाला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला.

आणखी एक दुर्दैवी घटना भंडाऱ्यातील जिल्हा परिषद शाळेतील आहे. या शाळेत विजेचा धक्का लागून एका ६ वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यशस्वी सोपान राऊत (वय ६ वर्ष) असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. अलीकडच्या २४ तासांत आणखी एक घटना उत्तर प्रदेशातील आहे. या उत्तर प्रदेशच्या देवराया जिल्ह्यामध्ये फ्रीजचा विजेचा झटका लागल्याने आई आणि मुलगी दोघीजणी मृत्युमुखी पडल्या आहेत.

माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार 55 वर्षीय महिला फ्रीजमध्ये ठेवलेले आंबे काढण्यासाठी गेल्या. जसा त्यांनी दरवाजा उघडला त्यांना विजेचा जोरदार झटका बसला आईला फ्रीजला चिटकलेले पाहून या महिलेची 30 वर्षीय मुलगी आई ला सोडवायला गेली पण तिला देखील विजेचा जोरदार झटका बसला. काही मिनिटांच्या आत दोघींचा जागीच मृत्यू झाला.

विजेचा धक्का

दोन दिवसांपूर्वी गोरेगाव परिसरातील एका मैदानात १० वर्षाच्या मुलाच्या विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. दुर्दैवाने मुलगा विजेच्या संपर्कात आला होता त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आदिल नावाचा मुलगा मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळताना त्यांचा बॉल पोलिस चौकीच्या छतावर गेला. छतावर अडकलेला बॉल काढण्यासाठी आदिल लोंखडी सुरक्षा भिंतीवर चढत होता. त्यावेळी तो विजेच्या संपर्कात आला. लोंखडी ताऱ्यांमुळे आणि विजेचा ताऱ्यामुळे त्याला विजेचा धक्का लागला. विजेचा धक्का इतका जोराला लागला की, तो तिथेच चिपकून राहिला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे देखील वाचा: Horoscope/ राशीभविष्य आजचं 4 जुलै: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यावसायिकांना मिळणार नफा, जाणून घ्या आजच्या राशीत तुमचे भविष्य

लाखांदूर तालुक्यातील मोहरणा गावात अशीच एक घटना घडली. आशा चौधरी ही घरातील कुलर स्टँडखाली टोपलीत ठेवलेली भाजी काढण्यासाठी गेली. यावेळी कुलरला करंट असल्याने तिचा स्पर्श स्टँडला झाला. करंट लागल्याने ती जोरात ओरडली. ओरडणे ऐकून त्यांच्या पतीने तत्काळ कुलर बंद केला. कुलरच्या विद्युत प्रवाहामुळे ती बेशुद्ध झाली. तिला लाखांदुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पावसाळ्यात विजेचा धक्का बसण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा चौपटीने अधिक असते. अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब अर्ध्यातून तुटून पडून किंवा शॉर्टसर्किटमुळे अपघात होतात. त्यामुळे शेतातील किंवा घरगुती विजेची उपकरणे हाताळताना थोडीशी चूक सुद्धा मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. याकरिता प्रत्येकाने सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

अतिवृष्टी किंवा वादळानंतर तारा, खांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, ट्रान्सफॉर्मरचे लोखंडी कुंपण, फ्यूज पावसाळ्यात विद्युत उपकरणांच्या बाबतीत सतर्कता हीच सुरक्षा आहे. सावध व डोळसपणे शेतात, परिसरात वावरायला हवे. काही तक्रार असल्यास त्वरित कार्यालयाशी संपर्क साधावा. स्वतः विजेच्या उपकरणाची दुरुस्ती करू नये.

विजेचा धक्का

बॉक्स; तसेच घरातील ओलसर विजेची उपकरणे, शेतीपंपाचा स्वीच बोर्ड, याकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असते. अवकाळी पावसात वादळी वाऱ्याने झाडांच्या मोठ्या फांद्या विजेच्या तारेवर पडतात. मोठ्या फांद्या पडल्याने विजेचे खांब वाकतात. त्यामुळे या तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्या तारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असते. अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या तारांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे.

हे देखील वाचा: crime news: मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला मरेपर्यंत जन्मठेप; विशेष सत्र न्यायाधीशांनी सुनावला निकाल

तुटलेल्या तारांना हात लावण्याचा किंवा त्या हटवण्याचा प्रयत्न करू नये. यासह घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करा. घरामध्ये शॉर्टसर्किट झाल्यास तत्काळ मेन स्वीच बंद करा. विजेच्या खांबाला किंवा ताणाला जनावरे बांधू नका. विजेच्या खांबाला दुचाकी टेकवू नका. डिश अँटेना खांबापासून दूर ठेवा. विद्युत साहित्य, उपकरणे आयएसआय प्रमाणित वापरा. या सर्व बाबींची दक्षता घेणे आवश्यक आहे.

विजेचा धक्का बसू नये म्हणून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 6 सूचना

■ विद्युत तारा लोंबकळत असल्यास तत्काळ ‘महावितरण’च्या संबंधित शाखेला माहिती द्या.
■ तारांमध्ये अडकलेल्या फांद्या तोडण्याचा प्रयत्न करू नका.
■ कमी होल्टेजमुळे ट्रिप होणारे स्टार्टर बायपास करू नका.
■ वेळोवेळी पंपाचे स्टाटर, फ्यूज, स्वीच, सर्किट ब्रेकर तपासून घ्यावेत.
■ पीक संरक्षणासाठी तारेच्या कुंपणात वीज प्रवाह सोडू नका.
■ शेतीसाठी अधिकृत जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *