सांगली

crime news: वडीलच मुलीच्या बाळाचा ‘बायोलॉजिकल फादर’

आयर्विन टाइम्स / बुलडाणा
चिखली तालुक्यातील एका गावात ४५ वर्षीय शेख शकील या वासनांध पित्याने आपल्याच १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. नंतर तिला धमकी देवून चुपचापही केले होते. परंतु या नराधमाचे दुष्कृत्य मुलीला गर्भधारणा झाल्यामुळे उघड झाले आणि नंतर कायद्याने पीडित मुलीला न्याय दिला. विशेष सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी ३ जुलै रोजी आरोपी शेख शकीलला पोस्को कायद्यातील मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

मोलमजुरी करून घर चालविणारा शेख शकील वळती मध्ये राहतो. डिसेंबर २०२२ मध्ये मुलीची आई नातेवाइकांकडे गेली होती. या दरम्यान बाहेरून दारू पिवून घरी आलेल्या शकीलने आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तीन महिन्यानंतर, मार्च २०२३ मध्ये पीडित मुलीच्या पोटात दुखू लागले. पिडीतेला घेऊन तिच्या आईने चिखली येथील रुग्णालय गाठले. तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आले की, पीडित मुलगी गर्भवती आहे.

येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. सदर प्रकरण कायद्याच्या कक्षेतील असल्यामुळे चिखली ठाण्याचे एपीआय प्रवीण तळे यांनी काही सहकाऱ्यासह पीडित मुलगी आणि तिच्या आईची पीडित मुलगी आणि तिच्या आईची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्यावर दबाव आणाल तर आम्ही मुलीचा उपचार करणार नाही. तिला मरू देवू”, अशी भूमिका शकीलच्या कुटुंबाने घेतली.

कुटुंबीयांकडूनच प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळे चिखली पोलिस ठाण्याचे एपीआय तळे यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात बलात्काराची तक्रार नोंदविली. तपास एपीआय सविता मोरे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्याच दिवशी, २० मार्च २०२३ रोजी या नराधम बापाला अटक करण्यात आली. तत्कालीन बुलडाणा डीवायएसपी सचिन कदम यांनी एपीआय प्रियंका गोरे यांना पीडित मुलीचा “इन कॅमेरा” जबाब नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानंतर एपीआय गोरे यांनी इन कॅमेरा जबाब घेतला. यावेळी हेकाँ झगरे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.

वडीलच ‘बायोलॉजिकल फादर’

प्रकरणात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच डीएनए तपासणीत बाळाची आई पीडिता असून पीडितेचे वडीलच म्हणजे शकीलच त्या बाळाचे “बायोलॉजिकल फादर” आहे. अॅड. खत्री यांनी प्रबळ युक्तिवाद केला. उपलब्ध तांत्रिक पुरावे, नोंदविलेल्या साक्षी आणि अॅड. संतोष खत्री यांनी जोरदारपणे मांडलेली सरकारी बाजू महत्त्वाची ठरली. बुधवार, ३ जुलै रोजी प्रकरणाचा निकाल लागला. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी पोक्सोच्या कलम ६ नुसार शेख शकीलला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सोबत ३ हजार रुपये दंड केला. दंड न भरल्यास तीन महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

crime news

crime news: गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा गजाआड: ‘एलसीबी’ची सापळा लावून कारवाई; दोन जिवंत काडतुसे केली जप्त

आयर्विन टाइम्स / सांगली
मिरजेत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्यास ‘एलसीबी’च्या पथकाने गजाआड केले. जावेद जाकिर शेख (वय ३०, ईदगाहनगर, उस्मानी मोहल्ला, मिरज) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ५० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

पोलिसांनी सांगितले, की मिरजेतील जनावर बाजार परिसरात एकजण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती एलसीबीच्या पथकास मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा लावला. काही वेळाने टी शर्ट व जिन्सची पॅट घातलेला एक तरुण बाजार परिसरातील प्रवेशद्वारापाशी येऊन थांबला. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

पोलिसांनी संशयित जावेद शेख याची झडती घेतली असता त्याच्याकडे कमरेस अडकवलेले ५० हजार रुपये किमतीचे १ देशी बनावटीचे पिस्तुल (मॅगझिनसह) आणि ८०० रुपयांची २ जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना नव्हता. त्यामुळे त्यास पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी जावेद शेख याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे महात्मा गांधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime news: पाळीव प्राण्यांच्या कारणातून भांडणात कुऱ्हाडीने मारहाण; कुत्र्याने शेळीला चावल्यावरून वाद

आयर्विन टाइम्स / इस्लामपूर
पाळीव प्राण्यांच्या किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार पेठ (ता. वाळवा) येथे घडला. याप्रकरणी सोमनाथ कांताराम शिंदे (पेठ, भीमनगर) याच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेल्या सूरज सतीश पवार (वय २४, भीमनगर, पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. ३० जून रोजी हा प्रकार घडला.

हे देखील वाचा: Beware! पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात? कोणत्या टाळाव्यात; या 4 भाज्यांकडे करा दुर्लक्ष

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सोमनाथ शिंदे याच्या कुत्र्याने चार वर्षांपूर्वी पवार यांच्या शेळीच्या गळ्याला चावा घेतला होता. शिंदे यांनी कुत्रे बांधून ठेवण्यास सांगितले होते. शिंदे याने त्याचा राग मनात धरून घरासमोर बांधलेल्या दुसऱ्या शेळीस काठीने मारहाण करून जखमी केले होते. तेव्हापासून शिंदे हा सतत दमदाटी व शिवीगाळ करत होता.

त्याने ३० जूनला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुऱ्हाडीच्या दांड्याने डाव्या पायाच्या मांडीवर तसेच डोक्यात ही मारहाण केली. भांडणात मध्ये पडलेल्या आई वनिता यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. इस्लामपूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *