इचलकरंजीतील १९ वर्षीय तरुणाचा अपहरण

सांगली जिल्ह्यात एकाच दिवसात दोन खून – सांगली शहरातील औद्योगिक वसाहतीत दगडाने ठेचून आणि तासगाव तालुक्यात नागाव निमणी येथे कुऱ्हाडीने वार करून दोन तरुणांचा निर्घृण खून. पोलिसांनी संशयितांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

सांगली औद्योगिक वसाहतीत तरुणाचा दगडाने ठेचून खून; पूर्वीच्या वादातून भीषण हल्ला: ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने शहरात खळबळ; पोलिसांनी आरोपीला अटक

(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सांगली : ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सां-गली शहर हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. वसंतदादा औद्योगिक वसाहतीत पूर्वीच्या भांडणातून एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. मृताचे नाव रोहित लक्ष्मण आवळे (वय २४, चिंतामणीनगर, झोपडपट्टी) असे असून, संशयित आदेश मधुकर डोईफोडे (वय २४, चिंतामणीनगर झोपडपट्टी) याला संजयनगर पोलिसांनी अटक केली आहे.

सांगली जिल्ह्यात दोन खून

घटनेचा तपशील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रोहित आवळे आणि संशयित आदेश डोईफोडे हे दोघेही मजुरीचे काम करत होते आणि एकाच झोपडपट्टीत राहत होते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. शुक्रवारी रात्री दोघे आणि त्यांचे दोन साथीदार दारू पिण्यासाठी वसंतदादा औद्योगिक वसाहतीत उडपी हॉटेल व बीएसएनएल ऑफिसजवळील पडक्या इमारतीसमोर बसले होते. काही वेळानंतर दोघे साथीदार निघून गेल्यानंतर रोहित आणि आदेश यांच्यात वाद झाला.

वाद चिघळत गेल्यानंतर आदेशने संतापाच्या भरात रोहितला मारहाण केली आणि त्यानंतर जवळच पडलेला दगड उचलून त्याच्या डोक्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या रोहितचा जागीच मृत्यू झाला. आदेश घटनास्थळावरून पसार झाला.

पोलिसांची तात्काळ कारवाई

घटनेच्या सुमारास संजयनगर पोलिसांची गस्त पथक बीएसएनएल ऑफिसजवळून जात असताना त्यांनी गर्दी पाहिली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता रोहित रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पोलिस निरीक्षक सतीश कदम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आणि संशयिताचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली.

सांगली जिल्ह्यात दोन खून

अल्पावधीतच पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत आदेश डोईफोडे याने वादातून खून केल्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी लक्ष्मण घेरडे यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांत असंतोष

गेल्या काही दिवसांपासून संजयनगर परिसरात गुन्हेगारी घटनांचा वाढता आलेख चिंतेचा विषय ठरला आहे. तत्कालीन पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या बदलीनंतर येथील नियंत्रण सैल झाल्याची चर्चा आहे. परिसरात सराईत गुन्हेगार, अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
नागरिकांनी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी कठोर पावले उचलून गुन्हेगारीवर आळा घालावा, अशी मागणी केली आहे.

हेदेखील वाचा: sangli crime news: सांगली जिल्हा गुन्हे वार्ता: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कोल्हापूरमधील आरोपीवर गुन्हा; बनावट नोटाप्रकरणी आणखी 1 अटकेत, याशिवाय वाचा फसवणूक, खून आणि चोरीच्या घटना

नागाव निमणी येथे मित्रांकडूनच तरुणाचा कुऱ्हाडीने खून; किरकोळ वादातून भीषण हल्ला; तासगाव तालुक्यात चार दिवसांत दुसऱ्या खुनाची घटना; पोलिसांची तत्काळ कारवाई, दोघा संशयितांना अटक

(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी)
तासगाव : तासगाव तालुक्यातील नागाव निमणी (पाचवा मैल) येथे शनिवारी दुपारी किरकोळ भांडणाच्या वादातून दोन मित्रांनी आपल्या साथीदाराचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. चेतन ऊर्फ बुलट्या दुर्ग्या पवार (वय ४६) असे मृताचे नाव असून, पोलिसांनी रोहित ऊर्फ बाळ्या पोपट मलमे आणि दत्तात्रय मच्छिंद्र गुजले या दोघा संशयितांना अटक केली आहे. चार दिवसांत झालेला हा दुसरा खून असल्याने तासगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

सांगली जिल्ह्यात दोन खून

घटनेचा तपशील

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत चेतन पवार आणि संशयित रोहित मलमे यांच्यात शुक्रवारी (दि. १७) किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास रोहित आणि दत्तात्रय हे दोघे दुचाकीवरून चेतनच्या घरी आले.
त्यावेळी चेतन आपल्या घराच्या दारात बसलेला असताना, रोहितने कुऱ्हाडीने त्याच्या डोक्यावर वार केला. गंभीर जखमी झाल्याने चेतनचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांची झटपट कारवाई

घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी संशयित रोहित मलमे आणि दत्तात्रय गुजले या दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले आणि अटक केली आहे.

या प्रकरणी मृत चेतन पवार याचा भाचा गणेश सुनील काळे यांनी फिर्याद दिली असून, तासगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिकांत चिंता

तासगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांत सलग दोन खून झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Written by- Irwin Times Digital Team
Source-Local correspondent, various media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *