यामाहा

यामाहाची ही मोटारसायकल तरुणांना नक्कीच आवडेल

Yamaha R15M ला नवीन कार्बन फायबर पॅटर्न ग्राफिक आणि बरीच अ‍ॅडव्हान्स्ड वैशिष्ट्ये देऊन लॉन्च करण्यात आली आहे, ज्यामुळे ही स्पोर्टी बाइक अधिक आकर्षक झाली आहे आणि तरुणांना खूपच आवडणारी ठरणार आहे.

यामाहा

इंडिया यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेडने भारतातील स्पोर्टी बाइक प्रेमींच्या आवडीचा विशेष विचार करून आपली R15M मोटरसायकल कार्बन फायबर पॅटर्न ग्राफिक्ससह लॉन्च केली आहे. तसेच यामध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, म्युझिक आणि व्हॉल्यूम कंट्रोल आणि एलईडी लायसन्स प्लेट लाइट सारखी अ‍ॅडव्हान्स्ड आणि आवश्यक फीचर्स दिली आहेत, ज्यामुळे हा मॉडेल इतरांपेक्षा खूपच उत्कृष्ट बनला आहे.

हे देखील वाचा: Electric Vehicle Safety / इलेक्ट्रिक वाहनांची सुरक्षितता: पावसाळ्यात आणि नंतरही काळजी आवश्यक

यामाहा R15M ही जपानी मोटरसायकल डिझाइन आणि अभियांत्रिकीचे कॉम्बो आहे आणि यामधील नवीन फीचर्स अपग्रेड कंपनीच्या ‘द कॉल ऑफ द ब्लू’ कॅम्पेनला सपोर्ट करतात.

यामाहा

किंमत काय आहे जाणून घ्या

कार्बन फायबर पॅटर्न असलेल्या नवीन Yamaha R15M ची एक्स-शोरूम किंमत 2,08,300 रुपये आहे आणि ही कोणत्याही यामाहा ब्लू स्क्वॉयर शोरूममध्ये उपलब्ध आहे. तसंच, मेटॅलिक ग्रे मध्ये अपग्रेडेड Yamaha R15M ची एक्स-शोरूम किंमत 1,98,300 रुपये आहे आणि ती सर्व यामाहा डीलरशिपवर उपलब्ध आहे.

हे देखील वाचा: flying car: फ्लाइंग कार प्रत्यक्षात कधी अवतरणार? या प्रश्नाचे उत्तर 2025 आहे का? तुर्कीमध्ये फ्लाइंग कारची निर्मिती सुरू झाल्याची बातमी आलीय

यामाहा

सुपरस्पोर्ट बाईकपासून प्रेरित

हे लक्षात घ्या की R15M बाईक ही यामाहाच्या प्रसिद्ध R1 मॉडेलपासून प्रेरित आहे आणि ती कंपनीच्या रेसिंग डीएनएच्या अनुषंगाने सुपरस्पोर्ट बाईक म्हणून तयार केली आहे. यामध्ये फ्युएल इंजेक्टेड 155 सीसी इंजिन आहे, जे 7500 आरपीएमवर 14.2 न्यूटन मीटरचा पिक टॉर्क आणि 10000 आरपीएमवर 13.5 किलोवॅटची जास्तीत जास्त पॉवर निर्माण करते.

हे देखील वाचा: बजाज ऑटोने बहुप्रतिक्षित पल्सर NS400Z केली लॉन्च: पल्सर लाइन-अपमधील सर्वात पॉवरफुल आणि ‘डेफिनेटली डेअरिंग’ लीडर

यामाहा

यामध्ये क्विक शिफ्टरची सुविधा आहे, ज्यामुळे क्लचचा वापर न करता किंवा थ्रॉटल मागे न घेता गिअर सहजपणे बदलता येतो. तसेच असिस्ट आणि स्लिपर क्लचमुळे राइडरला लीव्हर खेचण्यासाठी कमी शक्ती लागू होते आणि वेगवान इंजिन ब्रेकिंग टाळली जाते, ज्यामुळे वेगवान डाउनशिफ्टिंग दरम्यान बाईकचे मागील टोक डगमगत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !