उपग्रह आणि जगावर संकट

उपग्रह अंश, यानाचे तुकडे यांचाही मोठा कचरा

अंतराळ संशोधनामध्ये वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे मानवी जीवनाला उपयुक्त अशी अनेक साधने विकसित झाली आहेत. मात्र, याच प्रगतीने अंतराळात कचऱ्याचे संकट उभे केले आहे. उपग्रहांचे अंश, यानांचे तुकडे आणि अन्य अवशेष अंतराळात संचार करत असून, ते पृथ्वी आणि अंतराळातील उपग्रहांनाही धोका निर्माण करत आहेत.

उपग्रह आणि जगावर संकट

वाढत्या कचऱ्याचे स्वरूप

अहवालानुसार, पृथ्वीच्या कक्षेत सध्या 14,000 हून अधिक उपग्रह आहेत, त्यापैकी 3,500 निष्क्रिय आहेत. याशिवाय 12 कोटींहून अधिक लहान मोठ्या भंगाराचे तुकडे अवकाशात फिरत आहेत. या तुकड्यांपैकी काही 10 सें.मी. पेक्षा मोठे असून, त्यांचा वेग प्रतितास 28,000 कि.मी. आहे. एवढ्या वेगाने फिरणाऱ्या या तुकड्यांमुळे उपग्रह, अवकाश यान किंवा अन्य वस्तूंना गंभीर धोका निर्माण होतो.

हे देखील वाचा: Rising tiger mortality/ वाघांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण: संवर्धनासमोरील मोठी आव्हाने; देशात 3,682 वाघ असल्याची नोंद

भारताची भूमिका

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) याबाबत पुढाकार घेत असून, त्यांनी Satellites प्रक्षेपणाच्या तंत्रज्ञानात सुधारणा केली आहे. पीएसएलव्ही सी56 मिशनद्वारे सिंगापूरचे सात उपग्रह प्रक्षेपित करताना इस्रोने रॉकेटचा तिसरा टप्पा कमी कक्षेत आणून त्याचा पुनर्वापर होणार नाही, याची खात्री केली. याशिवाय मेघा-ट्रॉपिक्स-1 उपग्रहाचे पृथ्वीच्या वातावरणात पुनर्वसन करण्यात यश मिळवले आहे. हे तंत्रज्ञान भविष्यातील मिशनसाठी आदर्श ठरेल.

उपग्रह आणि जगावर संकट

जागतिक प्रयत्न

जगभरातील अनेक संस्था या संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अमेरिकन नासाने ‘इलेक्टो नेट’ विकसित केले आहे, जे कचरा बांधून वातावरणात पुन्हा आणण्याचे काम करते. जपानने ‘एल्सा डी’ नावाचा उपग्रह तैनात केला आहे, जो कचऱ्याचे मोठे तुकडे काढून टाकण्याचे काम करतो. जर्मनीची अंतराळ संस्था ‘डीएलआर’ लेझर तंत्रज्ञान वापरून कचऱ्याचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

हे देखील वाचा: Many problems due to insufficient government employees: सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या संतुलित ठेवणे आवश्यक; भारतात 1000 लोकसंख्येमागे फक्त 11 कर्मचारी

धोके आणि उपाय

अंतराळातील कचऱ्यामुळे टक्कर होण्याचा धोका वाढत आहे, जो Satellites सेवा, दळणवळण, आणि संशोधन मोहिमांसाठी घातक ठरू शकतो. यामुळे:
1. अंतराळ वाहनांवरील हल्ले – वेगाने फिरणारे तुकडे यानांवर आदळल्यास मोठे नुकसान होऊ शकते.
2. पर्यावरणीय परिणाम – अवशेष पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना जळून हानी पोहोचवतात.

उपग्रह आणि जगावर संकट

भविष्यातील उपाययोजना

1. आंतरराष्ट्रीय सहकार्य: यासाठी एक आंतरराष्ट्रीय चौकट तयार करणे आवश्यक आहे.
2. नवीन तंत्रज्ञान: स्वित्झर्लंडने ‘क्लीन स्पेस वन’ प्रकल्पाद्वारे उपग्रह कचऱ्याची समस्या सोडविण्याचे पाऊल उचलले आहे.
3. जनजागृती आणि नियमन: Satellites च्या लाँचिंगला अधिक नियंत्रित करणे आणि नव्या उपग्रहांसाठी पुनर्वापरक्षम तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे.

अंतराळातील कचरा हा जगासाठी मोठा धोका बनला आहे. इस्रोसारख्या संस्था यावर उपाय शोधत असल्या तरी आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय हा प्रश्न सोडवणे कठीण आहे. म्हणूनच, शाश्वत अंतराळ तंत्रज्ञान आणि प्रभावी नियमनाद्वारे आपण हे संकट दूर करू शकतो.

हे देखील वाचा: Change of name: नाव बदलण्याची परंपरा: आतापर्यंत देशात 9 राज्यं आणि 2 केंद्रशासित प्रदेशांची नावे बदलण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !