बचत

पैशांची बचत का करायची? बचतीमुळे काय होतं?

मित्र-मैत्रिणींनो, ‘थेंबे थेंबे तळे साचे’ असं आपण नेहमी वाचतो. ‘सेव्हिंग इज अर्निंग’, ‘पैशांची बचत करा’ असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं.  शाळेत देखील शिक्षक आपल्याला पैशांची बचत करायला सांगतात. पण पैशांची बचत का करायची? बचतीमुळे काय होतं असे प्रश्न तुम्हाला पडत असतील ना?, चला तर मग जाणून घेऊ.

दोस्तांनो, पैसे कमावणे हे जितके महत्त्वाचे, तितकेच त्याचा वापर कसा केला जातो हेही महत्त्वाचे आहे. अनेकदा आपल्याकडे असलेली रक्कम कशीही खर्च केली जाते आणि नंतर विशिष्ट गोष्टींसाठी गरज असते, तेव्हा हातात पैसाच नाही अशी वेळ येते. म्हणजे साधं तुमचंच उदाहरण घेऊ. तुम्हाला कधी पाहुणे हातांवर पैसे ठेवतात, कधी घरातली मोठी माणसं शाबासकी म्हणून पैसे देतात. ते तुम्ही पिगी बँकेत ठेवणं अपेक्षित असतं; पण अनेकदा तुम्ही ते पैसे खाऊ किंवा दुसऱ्याच कारणासाठी खर्च करता आणि कधी तुमच्यासाठीच खूप मोठी काही तरी वस्तू घ्यायची वेळ येते, तेव्हा तुमच्याकडे पैसेच नाहीत असं तुमच्या लक्षात येतं.

बचत

छोटी-छोटी रक्कम बचत करू शकता

त्याऐवजी आपण पिगी बँकेतले पैसे खर्चच केले नसते, तर बरं झालं असतं असं तुम्हाला वाटतं ना? हे तुम्हाला वाटणं म्हणजे बचतीची गरज. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ असं आपण नेहमी वाचतो. बचतीचं तसंच आहे. थोडी थोडी  रक्कम तुम्ही बाजूला ठेवत राहिलात, तर खूप मोठी रक्कम साठू शकते. त्यामुळे बचत अतिशय महत्त्वाची. तुम्ही बाजूला ठेवलेले पैसे कुठल्याही मार्गानं साठवू शकता; फक्त आवश्यकता आहे, ती त्या वेळी खर्च करण्यावर थोडा ताबा ठेवण्याची आणि बचतीची गरज लक्षात घेण्याची. तुम्ही स्वतः तर तुम्हाला मिळालेली छोटी-छोटी रक्कम बचत करू शकताच; शिवाय तुमच्या आई बाबांना देखील ही बचत करायला विनंती करू शकता.

हे देखील वाचा: To live like a tiger: वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी; जगातील 75 टक्के वाघ एकट्या भारतात ; वाघांची संख्या कमी होऊ न देणं, त्यांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य

बचत का आवश्यक आहे?

१. सध्या न परवडणाऱ्या वस्तू नंतर विकत घेता याव्यात यासाठी
२. आजारपण, आपत्ती, अपघात, मृत्यू अशा अचानक उद्भवणाऱ्या अडचणींच्या वेळी खर्च भागवण्यासाठी
३. घरखरेदी, उच्च शिक्षण अशा मोठ्या खर्चिक बाबींची तरतूद करण्यासाठी
४. ज्या वेळी आपण कमाई करू शकत नाही, अशा वृद्धापकाळातील खर्चासाठी

बचत

बचत बँकेतच का करावी?

१. सुरक्षितता : घरातील कपाटात, पेटीत, चटईखाली अगदी पाकिटात ठेवलेले पैसे केव्हाही चोरीला जाऊ शकतात किंवा ते नाहीसे होऊ शकतात. पूर, आग अशा आपत्तीच्या वेळी या पैशांचे नुकसान होऊ शकते. त्याऐवजी बँकेत पैसे ठेवणे सर्वच दृष्टीने सुरक्षित असते.२. पैशाची वृद्धी : बँकेतील खात्यावर ठेवलेल्या पैशावर आपल्याला व्याज मिळू शकते. त्यामुळे आपल्या पैशाची वाढ होऊ शकते. घरात ठेवलेला पैसा वाढत नाही. ३. कर्ज : आपण बचत केलेल्या पैशावर, मुदत ठेवींवर, आवर्ती ठेवींवर आपल्याला कर्जही मिळू शकते. त्यामुळे घरखरेदी, शिक्षण अशा खर्चासाठी पैसा उभारता येतो.

हे देखील वाचा: The wonderful cave of Baba Amarnath : बाबा अमरनाथ यात्रा मार्ग : अध्यात्म आणि निसर्ग यांचा संगम; यात्रा 19 ऑगस्ट 2024 पर्यंत चालणार

बँकेतील खात्यांचे प्रकार

१. बचत खाते
■ खात्यावर सुलभपणे पैसे भरणे किंवा काढण्याची सोय
■ या खात्यावर ग्राहकाला पासबुक, चेक बुक, एटीएम, डेबिट कार्ड मिळते. ठेवींवर व्याज मिळते

२. करंट अकाऊंट (चालू खाते)
■ संस्था किंवा कंपनीच्या नावाने हे खाते उघडता येते
■ यातील व्यवहारावर कोणतीही मर्यादा नाही
■ या खात्यातील ठेवीवर व्याज मिळत नाही

३. आवर्ती ठेव खाते
■ यामध्ये दर महिन्याला किंवा विशिष्ट काळानंतर रक्कम या खात्यात जमा केली जाते.
■ या खात्यावर बचत खात्यापेक्षा अधिक व्याज मिळते
■ ठेवीची मुदत संपल्यावर किंवा त्या आधीसुद्धा ठेवलेले पैसे काढता येतात.
याशिवाय बँकेत झिरो बॅलन्स अकाउंट, सॅलरी अकाउंट, एनआरआय अकाउंट असेही प्रकार असतात.

बचत

आपल्या ग्राहकाची ओळख (के.वाय.सी.)

बँकेत खाते उघडतेवेळी ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी आणि त्याच्या राहत्या घराचा पत्ता नोंदविण्यासाठी माहिती जमा करण्याची प्रक्रिया म्हणजे केवायसी.
के.वाय.सी.साठी अधिकृतपणे ग्राह्य धरण्यात येणारी कागदपत्रे : अ) पासपोर्ट ब) वाहन परवाना क) मतदार ओळखपत्र ड) पर्ने कार्ड इ) आधार कार्ड फ) “मनरेगा” कार्ड या कागदपत्रांवर राहण्याचा पत्ता दिलेला असेल तर ती कागदपत्रे पत्त्याला पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातील

हे देखील वाचा: गुरुपौर्णिमा 21 जुलै : शिक्षकाचा प्रवास; गुरुकुलातील शिक्षक ते आजच्या आधुनिक तंत्रज्ञानातला एआय शिक्षक / Modern Technology AI Teacher

बँकांकडून मिळणाऱ्या सेवा-सुविधा

■ देयके (रिमीटन्स): बँकेमार्फत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पैसा सुलभ व जलद तसेच सुरक्षितपणे हस्तांतरीत करता येते. बँकेच्या कोणत्याही शाखांमध्ये, बँक मित्र, मायक्रो एटीएम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एनईएफटी, आरटीजीएस मार्फतही हे व्यवहार करता येतात.

■ मोबाईल बँकींग: निधी हस्तांतरण एनईएफटी / आरटीजीएस, आयएमपीएस आणि बिलांची पेमेंट्स

बचत

■ एटीएम कार्ड: पैसे काढण्यासाठी सर्व एटीएम केंद्रांवर चालते व पीओएस मशीनद्वारे “कॅशलेस” खरेदी करता येते. एटीएम मशीन किंवा पीओएस मशीन व्यवहारासाठी पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (पिन) वापरला जातो. पिन नंबर ठराविक अवधीनंतर बदलता येतो. हा नंबर अन्य कोणास कळू देऊ देऊ नये. निरक्षर व्यक्तीलाही एटीएम कार्ड जारी केले जाते. रूपे डेबिट कार्ड हे नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया तर्फे जारी करण्यात येणारे देशांतर्गत वापरासाठीचे स्वदेशी कार्ड आहे. त्यात एक लाख रूपयाच्या विम्याचा अंतर्भाव असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed