पहाटे डोक्यात दगड घालून केला खून (murder)
इस्लामपूर, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा):
वाळवा तालुक्यातील चिकुर्डे (जि. सांगली) येथे घरगुती वादातून पतीने पत्नीचा खून (murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संशयित उत्तम हणमंत बुरसे-पाटील (वय ५२) यांनी आपल्या पत्नी कविता उत्तम बुरसे-पाटील (वय ४२) यांच्या डोक्यात पहाटेच्या सुमारास दगड घालून त्यांचा मृत्यू घडवला. घटनेनंतर उत्तम स्वतः कुरळप पोलिस ठाण्यात हजर झाला.
घटनेची पार्श्वभूमी जाणून घ्या
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करंजवडे येथील कविता यांचा चौवीस वर्षांपूर्वी उत्तम बुरसे-पाटील यांच्याशी विवाह झाला होता. उत्तम उच्चशिक्षित असून, ते एका सहकारी साखर कारखान्यात नोकरीला आहेत. घरगुती कलहाच्या कारणास्तव कविता चार महिन्यांपासून माहेरी करंजवडे येथे राहत होत्या. नवरात्रोत्सवात पती उत्तम याच्या विनंतीवरून त्या परत सासरी आल्या होत्या. मात्र, घरातील वाद काही थांबले नाहीत, आणि अखेरीस हे वाद तिच्या जीवावर बेतले.
खूनाची (murder) घटना कशी घडली?
मंगळवारी (ता. १२) रात्री गावात प्रचार करून घरी परतलेल्या उत्तम यांच्यात आणि कवितात पुन्हा वाद झाला. भांडणानंतर दोघेही झोपले. मात्र, उत्तमच्या मनात काहीतरी ठरत असावे. पहाटे पाचच्या सुमारास त्याने घराबाहेरील मोठा दगड आणून झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात घालून तिचा खून (murder) केला. त्यानंतर अंघोळ करून शेजाऱ्यांना ही माहिती देत, पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.
शवविच्छेदन व तपास
कुरळप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कविताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगली-मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक सुनील माने, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने अधिकचा तपास सुरू केला आहे.
एकाच आठवड्यात दुसरी घटना; परिसरात भीतीचे वातावरण
कुरळप पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. चार दिवसांपूर्वीच कुरळप पोलिस ठाण्यांतर्गत इंदूमती पाटील या वृद्धेचा धारदार हत्याराने खून (murder) झाल्याची घटना घडली होती. एकाच आठवड्यात दोन महिलांच्या खुनाने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुलांवर दुःखाचा डोंगर; मुले झाली पोरकी
कविता व उत्तम यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा पदवीच्या शेवटच्या वर्षात, तर मुलगी डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. बाहेरगावी असलेल्या मुलांना आईच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पित्यानेच आईचा जीव घेतल्याने दोघांनीही आई-वडिलांचे छत्र गमावले आहे. आईच्या खून (murder) प्रकरणी वडीलादेखील तुरुंगात त्यामुळे मुले पोरकी झाली.
भावाची आर्त विनवणी आणि पश्चाताप
मृत कविता हिचा भाऊ सुरेश पाटील यांनी बहिणीच्या मृतदेहासह कुरळप पोलिस ठाण्यात येऊन, “मला एकदा त्या नराधमाला पाहू द्या,” अशी विनवणी केली. गरीबीतून बहिणीला शिकवून, तिचे चांगले लग्न केले होते, मात्र सासरच्या वादात तिचा जीव गमवावा लागला. ‘तिला माघारी पाठवून चूक झाली,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी त्यांना धीर दिला आणि परिस्थितीची जाणीव करून दिली.
परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांची कसून तपासणी सुरू
लागोपाठ परिसरात दोन खुनाच्या (murder) घटना घडल्या आहेत. दोन्ही घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस अधिक तपास करत असून, अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.