Tasgaon

आरोपी तासगावच्या (Tasgaon) इंदिरानगर झोपडपट्टीतील रहिवाशी

सांगली,(आयर्विन टाइम्स):
विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याच्या गंभीर प्रकरणात पांडुरंग श्रीरंग केंगार (वय २६, इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव -Tasgaon) याला सांगली सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि साडेपाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सत्र न्यायाधीश श्रीमती एम. एस. काकडे यांनी हा निकाल दिला असून, सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन नरवाडकर यांनी युक्तिवाद सादर केला.

Tasgaon

शिक्षेचे तपशील

पांडुरंग केंगार याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२) (एन) नुसार बलात्कारासाठी १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपयांचा दंड, तसेच कलम ३६३ नुसार अपहरणासाठी १ वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड, तसेच कलम ३४२ नुसार बेकायदेशीररीत्या कैदेत ठेवण्यासाठी ३ महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त साध्या कैदेत त्याला शिक्षा भोगावी लागेल. सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

हे देखील वाचा: pune crime news: खंडणीसाठी अपहरण केलेल्या ठेकेदाराचा खून : ओसाडे गावच्या हद्दीत छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; 2 कोटी रुपयांसह एका आलिशान चारचाकी वाहनाची मागितली होती खंडणी

घटनेची पार्श्वभूमी

२६ ऑक्टोबर २०२० रोजी, पीडित महिला कपडे धुण्यासाठी जवळच्या ओढ्यावर गेली असता पांडुरंग केंगार तिथे मोटारसायकलवर आला. त्याने महिलेचे तोंड दाबून जबरदस्तीने तिला गाडीवर बसवले व वंजारवाडी येथील निर्जन स्थळी असलेल्या एका घरात नेले. त्या ठिकाणी त्याने पीडित महिलेवर बलात्कार केला आणि २६ ते ३० ऑक्टोबर २०२० या दरम्यान वारंवार अत्याचार केले. या प्रकरणात पीडित महिलेने तासगाव (Tasgaon) पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

पोलिस तपास आणि साक्षीदारांची भूमिका

सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपी पांडुरंग केंगारविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये तासगाव (Tasgaon) पोलिस ठाण्याचे रवींद्र माळकर आणि पैरवी कक्षातील सुनित आवळे, रेखा खोत, व अर्चना कांबळे यांनी महत्त्वपूर्ण मदत केली.

हे देखील वाचा: Jat crime news : जत, उमदी पोलीस ठाणे हद्दीतून 3 गुन्हेगारांची हद्दपारी; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई

न्यायालयीन निवाडा

सर्व साक्षीदारांच्या जबानी आणि पुरावे लक्षात घेऊन, तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा आधार घेत, न्यायालयाने पांडुरंग केंगारला दोषी ठरवले. या निकालाने अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्याच्या न्यायालयाच्या निर्धाराची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed