जत

जतसारख्या भागात ऊस लागवडीला आलेले पुनरूज्जीवन हे म्हैसाळ योजनेमुळे शक्य झाले असून जिल्ह्याच्या एकंदर ऊस क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.

सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जतसारख्या दुष्काळी ओळखीच्या तालुक्यात यंदा उसाचे क्षेत्र तब्बल दुप्पट झाले असून ३० हजार एकरांवर उसाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी हेच क्षेत्र फक्त ५ हजार हेक्टर होते. जिल्हा पातळीवर उसाचे एकूण क्षेत्र यंदाच्या २०२५-२६ हंगामात १ लाख ३८ हजार ९०४ हेक्टरवर पोहोचले आहे. सततच्या पावसामुळे मागील वर्षी आडसाली हंगामातील उस लागवड ठप्प झाली होती. परिणामी यंदा शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी व सुरू हंगामातील उसालाच प्राधान्य दिले.

जतमध्ये उसाचे पुनरागमन – ‘म्हैसाळ’चे पाणी फळास येते
जत तालुक्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा ऊस लागवडीकडे वळव घेतला आहे. त्यामुळे यंदा जतमध्ये तब्बल २२ हजार ३४५ हेक्टर क्षेत्र गाळपासाठी सज्ज झाले आहे. यामध्ये आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू या तिन्ही हंगामांतील उसाचा समावेश आहे. तसेच ६,७०७ हेक्टर क्षेत्रात खोडव्याही ठेवले गेले आहेत.

जत

काही भागांमध्ये घट – आटपाडी आणि कवठेमहांकाळ
मागील हंगामाच्या तुलनेत आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यात उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. आटपाडीत गेल्या वर्षी २५३३ हेक्टरवर उसाची लागवड होती, ती यंदा घटली असून कवठेमहांकाळमध्ये ४७२२ हेक्टरवरून घट झाली आहे.

हेदेखील वाचा: sangli crime news: सांगली जिल्ह्यात दर 5 दिवसांत एक खून – गुन्हेगारीचे वाढते सावट चिंतेची घंटा

उत्पादकतेत घसरण
गेल्या हंगामात जिल्ह्याची सरासरी उत्पादकता ८३ टन प्रति हेक्टर इतकी होती. यंदा मात्र ती घटून ७७.३३ टन प्रति हेक्टर इतकी झाली आहे. संततधार पावसामुळे लागवड व वाढीच्या टप्प्यावर पाणी साचल्याने उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला असल्याचे कारण कृषी विभागाने दिले आहे.

जतसारख्या भागात ऊस लागवडीला आलेले पुनरूज्जीवन हे म्हैसाळ योजनेमुळे शक्य झाले असून जिल्ह्याच्या एकंदर ऊस क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. यामुळे ऊस शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, पाण्याची उपलब्धता असल्यास ते पुनश्च ऊसाला पसंती देतील, हे यंदाच्या क्षेत्रवाढीवरून स्पष्ट झाले आहे.

जत

हंगामनिहाय उसाचे क्षेत्र (जिल्हा): पूर्वहंगामी: २२,८०६ हेक्टर, सुरू हंगाम: १७,७४८ हेक्टर, आडसाली: ४७,०६३ हेक्टर, गाळप क्षेत्र (२०२४-२५): एकूण १,३७,१०३ हेक्टर
तालुकानिहाय ऊस क्षेत्र (हेक्टरमध्ये): तालुका आणि पुढे ऊस क्षेत्र: पलूस :१६,७४४, मिरज ९,६१९, तासगाव, १३,७४३, कडेगाव १७,३६०, वाळवा ३१,२०४, शिराळा १०,३८६, खानापूर २०,०३०, आटपाडी, १,८७३, कवठेमहांकाळ ५,५०५, जत १२,४३५, एकूण १३८,९०४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *