Sangli News

मिरज तालुक्यातील एका गावातील दोन भावांचा दोन अल्पवयीन मुलींशी विवाह

आयर्विन टाइम्स / मिरज
Sangli News: सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एका गावात बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईन संस्थेला मिळाली. त्यानुसार संस्थेचे कार्यकर्ते तिथे पोहचले. यावेळी संतप्त जमावाने धक्काबुक्की केल्याचा आरोप संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बालकल्याण समितीच्या आदेशानंतर तातडीने गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी दिली. दरम्यान, आठवड्यात दुसऱ्यांदा ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

घटनेची अधिक माहिती अशी, मिरज तालुक्यातील एका गावातील दोन भावांचा दोन अल्पवयीन मुलींशी विवाह नियोजित होता. ही माहिती चाईल्ड लाईन संस्थेला हेल्पलाईनद्वारे मिळाली. त्यांनी तातडीने बालकल्याण समितीला याबाबतची माहिती दिली. त्यांच्या निर्देशानुसार विवाहस्थळी पथक दाखल झाले. तत्पूर्वीच विवाह झाला होता. त्यानंतर चाईल्ड लाइनची टीम दाखल झाल्यानंतर त्यांनी चित्रीकरणाला सुरुवात केली. त्यावेळी संबंधितांनी धक्काबुक्की केली.

दरम्यान, डायल ११२ ला माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यानंतर बाल कल्याण समितीकडे सर्व माहिती देण्यात आली. चाईल्ड लाइनचे प्रियांका माने, मिनाज शेख, शानुर दानवाडे,विशाल पाटोळे, आरती निडसोसे, इम्तियाज हकीम यांच्यासह संजयनगर पोलिस ठाणे यांनी संयुक्त प्रक्रिया राबविली.

” मिरज तालुक्यातील एका गावात बालविवाह झाल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर धक्काबुक्कीचा प्रकार झाल्याचेही समोर आले. मात्र, बालकल्याण समितीच्या निर्देशानंतर पुढील कारवाई केली जाईल. – बयाजीराव कुरळे, निरीक्षक, संजयनगर

Sangli

कर्मचारी संगणकावर गेम खेळण्यात दंग तासगाव पंचायत समितीतील प्रकार उघड : नागरिकांतून संताप

आयर्विन टाइम्स / तासगाव
तासगाव येथील पंचायत समितीत संगणकावर खेळ खेळत असताना कर्मचारी आढळल्याने कामासाठी आलेल्यांनी त्याचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित केले. दरम्यान, पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनीही दखल घेतली. संगणकावरील ‘खेळा’च्या छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित होऊन उलटसुलट चर्चेचा विषय बनला आहे.

तासगाव पंचायत समितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आज तोडलेल्या झाडांची तक्रार घेऊन गटविकास अधिकाऱ्यांना भेटण्यास गेले होते. मात्र कार्यालयात काही जण काम सोडून टेबलवर बसून चक्क गेम खेळत असल्याचे निदर्शनास आले. पंचायत समिती म्हणजे ग्रामीण विकासाचे केंद्र. पंचायत समितीला ‘मिनी मंत्रालय’ जाते. ग्रामीण भागातील असंख्य नागरिक विविध कामासाठी या ठिकाणी येत असतात अशा वेळी त्यांना कामासाठी प्रतिसाद मिळणे अपेक्षित असते; प्रत्यक्षात काय अनुभव येतो, हे सर्वश्रुत आहे. आज हा प्रकार पाहायला मिळाल्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची मोबाईलवर छायाचित्रण केले. समाज माध्यमावर प्रसारित केले. हे फोटो आणि त्यावरील चर्चा इतकी ‘व्हायरल’ झाली, की दखल थेट गटविकास अधिकारी संताजी पाटील यांना घ्यावी लागली.

पाटील यांनी हा प्रकार कानावर आला असून संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करू, अशी प्रतिक्रिया ‘सकाळ’ शी बोलताना दिली. दरम्यान, मनसेचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य कामासाठी दररोज हेलपाटे मारतात. आज नाही, उद्या या असे सांगत शेतकरी व ग्रामीण लोकांना अधिकारी हेलपाटे मारायला लावतात. अधिकारी संगणकावर गेम खेळताना दिसतात. कोणाचे नियंत्रण नाही का, अशी प्रतिक्रिया दिली.

विहिरीत पाय घसरून पडून मालगावला शिक्षकाचा मृत्यू

मालगाव (ता. मिरज) येथील सावंत अॅकॅडमीचे संचालक सुधाकर राजाराम सावंत (वय ४८) यांचा आज सकाळी घराजवळील विहिरीत पाय घसरून पडल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे. याबाबतची माहिती अशी, की सुधाकर सावंत हे दररोज सकाळी घरातून व्यायामासाठी फेरफटका मारायला बाहेर पडत असत. घरी परतताना घराशेजारील विहिरीतील माशांना खाऊ म्हणून धान्य घालत. त्यांचा हा नित्यक्रम होता.

आज सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला जाऊन घरी परत येत असताना हा प्रकार घडला. दरम्यान, आज सकाळी ते नेहमीप्रमाणे फेरफटका मारून आल्यानंतर माशांना खाद्य
घालताना विहिरीत पाय घसरून पडल्यानंतर खोल पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ते विद्यार्थीप्रिय होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे मालगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा: शिक्षकांच्या प्रमाणपत्राची आता पडताळणी होणार: प्राथमिक शिक्षणाधिकारी; दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी होणार असल्याने खळबळ  

दरम्यान, याघटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना दिली असता मिरज ग्रामीण पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स व महादेव अँब्युलन्स सर्व्हिसच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा करून मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मिरज ग्रामीण पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली असून  पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 26 जून: मेष, मिथुनसह इतर 6 राशीच्या व्यावसायिकांसाठी नफा देणारा दिवस; इतरांनीही जाणून घ्या आपले राशिभविष्य आजचं  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed