सांगली

सांगली शहरात धारधार हत्यारे बाळगून दहशत माजवणाऱ्या ३ आरोपी आणि २ विधीसंर्घर्षित बालकांना पोलिसांनी अटक केली. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई करत ५ गुन्हे दाखल केले. आरोपींकडून लोखंडी धारधार कोयते जप्त करण्यात आले असून, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार शहरात कठोर कारवाई सुरू आहे. नागरिकांनी संशयास्पद व्यक्तींबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सांगली

सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी धारधार हत्यारे बाळगून दहशत माजवणाऱ्या ३ आरोपींसह २ विधीसंर्घर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले.  शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलेल्या या कारवाईत ५ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे देखील वाचा: miraj crime news: मिरज येथे मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना अटक: 6 मोटारसायकली जप्त

पोलिसांची प्रभावी कामगिरी
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार,  शहरात अवैध शस्त्र बाळगणारे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम. (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेले आरोपी आणि त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली हत्यारे
पोलिसांनी ३०० ते २०० रुपयांच्या किमतीचे धारधार लोखंडी कोयते जप्त केले आहेत. ही कारवाई वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली:

१) जुना बुधगाव रोड, राजीव गांधी नगर (दि. ३१ जानेवारी २०२५, रात्री ९:३० वाजता)
– आरोपी: रोहीत बाळु सपाटे (वय २३, रा. इंदिरानगर, सांगली)
– ताब्यात घेतलेले हत्यार: ४८ सेमी लांबीचा धारधार कोयता
– गुन्हा दाखल: गु.र.नं. ४१/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा क ३७(१)(३)

हे देखील वाचा: वाहनांची आरसी आणि ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी जोडली जाणार; वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर सरकारची कठोर कारवाई; 12000 कोटींचे ई-चालान अद्याप थकीत! Vehicle RC and driving license to be linked with Aadhaar

२) आर्दश इंडस्ट्रीज, १०० फुटी रोड, सांगली (दि. २८ जानेवारी २०२५, सकाळी १२:३० वाजता)
– आरोपी: सोहेल हारुण शेख (वय २७, रा. ५० फुटी रोड, सांगली)
– ताब्यात घेतलेले हत्यार: ३०० रुपयांचा लोखंडी धारधार कोयता
– गुन्हा दाखल:  शहर पोलीस ठाणे

३) काळी वाट, हरिपूर रोड, सांगली (दि. ३१ जानेवारी २०२५, रात्री ११:०० वाजता)
– आरोपी: १ विधीसंर्घर्षित बालक
– ताब्यात घेतलेले हत्यार: २४ इंच लांबीचा लोखंडी धारधार कोयता
– गुन्हा दाखल:  शहर पोलीस ठाणे

४) आकाशवाणी रोड, सांगली (दि. ३१ जानेवारी २०२५, रात्री ११:३० वाजता)
– आरोपी: १ विधीसंर्घर्षित बालक
– ताब्यात घेतलेले हत्यार: १४.२ इंच लांबीचा धारधार कोयता
– गुन्हा दाखल:  शहर पोलीस ठाणे

५) सिद्धार्थ परिसर, सांगली (दि. २९ जानेवारी २०२५, रात्री १०:०० वाजता)
– आरोपी: धनंजय शैलश भोसले (वय २६, रा. मॉडर्न बेकरीजवळ, सांगली)
– ताब्यात घेतलेले हत्यार: १६ इंच लांबीचा लोखंडी धारधार कोयता
– गुन्हा दाखल:  शहर पोलीस ठाणे

हे देखील वाचा: प्रतीक्षा संपली! ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ 18 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला; New family Marathi film

कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी
ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने केली. त्यामध्ये खालील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते:

– पोलीस उपनिरीक्षक: महादेव पोवार
– पोलीस हवालदार: संदीप पाटील, विनायक शिंदे, रफिक मुलाणी
– पोलीस कॉन्स्टेबल: संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, गणेश कोळेकर, योगेश सटाले, संदीप कोळी, दिग्विजय साळुंखे, योगेश हाक्के

पोलिसांचे अवैध शस्त्रधारकांविरोधात कठोर पाऊल
शहरात रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच अवैध हत्यारे बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे  जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले. शहरात दहशत माजवणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध पोलिसांचे ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन
 शहरातील नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद व्यक्ती किंवा अवैध शस्त्र बाळगणाऱ्या लोकांची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ १०० किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *