सांगली शहर पोलीस ठाण्याची कारवाई
सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा):
सांगली शहरात अवैध गांजा विक्री करणारा सराईत गुन्हेगार अभिनंदन पाटील (वय 32, रा. कोथळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याला सांगली शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल १० किलो २८६ ग्रॅम गांजा, एक मोटारसायकल आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून, एकूण मुद्देमालाची किंमत ४,००,०६० रुपये आहे. आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गुन्ह्याचा तपशील
गुन्हा क्रमांक: 562/2024
कलम: अमली पदार्थ अधिनियम ८(क), २०(ब)(।।)(ब)
फिर्यादी: सचिन जयसिंग शिंदे, पोहेका/548, सांगली शहर पोलीस ठाणे येथे नियुक्त
आरोपी: अभिनंदन राजगोंडा पाटील, वय 32 वर्षे, व्यवसाय – मजुरी, राहणार कोथळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
अटक वेळ: 10/11/2024 रोजी सकाळी 03:40 वाजता
गुन्ह्याची घटना
दि. 10/11/2024 रोजी मध्यरात्री 00:10 वाजता सांगलीतील सुभाषनगर गल्ली नं. १ येथे आकाशवाणी ते काळीवाटकडे जाणाऱ्या मार्गावर आरोपी अभिनंदन पाटील गांजा व अन्य मुद्देमालासह आढळला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रचलेल्या सापळ्यात आरोपीस पकडण्यात आले. आरोपीस 03:15 वाजता अटक करण्यात आली.
मिळालेला मुद्देमाल
1. गांजा: 10 किलो 286 ग्रॅम वजनाचा गांजा, किंमत 3,60,010 रुपये
2. मोटारसायकल: हिरो होंडा कंपनीची फॅशन मोटारसायकल, लाल व काळ्या रंगाची, किंमत 30,000 रुपये
3. मोबाईल: विवो कंपनीचा मोबाईल, किंमत 10,000 रुपये
4. कापडी पिशवी: पिवळ्या व पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी, किंमत 50 रुपये
एकूण मुद्देमाल किमतीचा अंदाज: 4,00,060 रुपये
कारवाई करणारे पथक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पोवार, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप पाटील, सचिन शिंदे, योगेश सटाले, विनायक शिंदे, गणेश कोळेकर, प्रशांत पुजारी, आणि पोलीस हवालदार चालक क्षीरसागर यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
प्रकरणाची हकीकत
वर नमूद केलेल्या तारखेस आणि वेळी आरोपीस मोठ्या प्रमाणात गांजा स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात ठेवलेला आढळून आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रणदिवे करीत आहेत.