सांगली

विशेष मोहीमेअंतर्गत सांगलीत कारवाई

सांगली, (आयर्विन टाइम्स):
सांगली शहरातील संजयनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या युवकास अटक करून, त्याच्याकडून ५०,४०० रुपये किमतीचे शस्त्र आणि काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी करण्यात आलेल्या विशेष मोहीमेत केली गेली.

सांगली

कारवाईचा तपशील

दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी, सायंकाळी ५:१५ वाजता, संपत चौक येथील आर.टी.ओ ऑफिसजवळ, एक इसम अवैधरित्या पिस्तूल बाळगून थांबला असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार दिपक गायकवाड यांना मिळाली. प्राप्त माहितीनुसार, पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने त्वरित आर.टी.ओ ऑफिसच्या परिसरात सापळा रचला. तेथे एक इसम संशयास्पदरीत्या थांबलेला आढळला.

हे देखील वाचा: sangli crime news: सांगलीत अवैध शस्त्र बाळगल्याबद्दल जत तालुक्यातील युवकाला अटक, 61000 रुपये किंमतीचे शस्त्र हस्तगत

त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. या शस्त्रासंबंधी त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नव्हता. त्यानुसार, आरोपीवर भारतीय हत्यार अधिनियम कलम ३,२५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीची माहिती आणि जप्त शस्त्र

आरोपीचे नाव ओंकार दिपक जाधव (वय २२ वर्षे, रा. विद्यानगर, सैदापुर, ता. कराड, जि. सातारा) असे आहे. त्याच्याकडून ५०,००० रुपये किमतीचे पिस्तूल व ४०० रुपये किमतीच्या दोन पितळी जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. हे शस्त्र मॅग्झीनसह पिस्तूल असून, काळ्या रंगाची प्लॅस्टीक मुठ होती.

हे देखील वाचा: Anti-Corruption Bureau news : सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई: महिला तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांसह तिघांना रंगेहाथ पकडले; 24 हजार रुपयांची लाच स्वीकारताना केली कारवाई

कारवाईतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार

पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण स्वामी, पोलीस हवालदार विनोद साळुंखे, संतोष पुजारी, दिपक गायकवाड, कपिल साळुंखे, नवनाथ देवकते आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

पोलीस तपास

आरोपीला अटक करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी करत आहेत.

हे देखील वाचा: Accident News: जत तालुक्यातील 23 वर्षीय तरुणाचा अलकुड एम येथे झालेल्या अपघातात मृत्यू: मोटारसायकलला चारचाकीची जोरदार धडक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !