सांगली

सारांश: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय चेन स्नॅचर मेहंदी हसन सय्यद याला अटक करून ४,०६,७०० रुपये किंमतीचे दागिने व मोटारसायकल जप्त केली. सांगली आणि मिरजमध्ये चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात तो वॉंटेड होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सुतगिरणी चौकाजवळ सापळा रचून त्याला पकडले. आरोपीचा मोठा गुन्हेगारी इतिहास असून, पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे.

सांगली

सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने आंतरराज्यीय सराईत चेन स्नॅचर मेहंदी हसन अक्रम अली सय्यद (वय ३८, रा. बिदर, कर्नाटक) याला अटक करून ४,०६,७०० रुपये किंमतीचे दागिने व मोटारसायकल जप्त केली.

हे देखील वाचा: Unique Hotel: बुर्ज अल अरब: जगातील एकमेव 10-स्टार हॉटेलचे अद्वितीय वैभव; एका रात्रीसाठी खर्च करावे लागतात 10 लाख रुपये

गुन्ह्याचा तपशील
सांगलीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चैन, माळ जबरीने ओरबाडून पळणाऱ्या टोळीच्या हालचालींवर LCB पोलिसांचे लक्ष होते. पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सांगली सुतगिरणी चौक ते कुपवाड रोड परिसरात सापळा रचला.

सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोह/ सागर लवटे, पोह / अनिल कोळेकर व पोशि/ विक्रम खोत यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मेहंदी हसन अक्रम अली सय्यद हा मोटार सायकलीवरून चोरी केलेले दागिने विक्री करीता सांगली सुतगिरणी चौक ते कुपवाड रोड परिसरामध्ये येणार आहे.

हे देखील वाचा: वाहनांची आरसी आणि ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी जोडली जाणार; वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर सरकारची कठोर कारवाई; 12000 कोटींचे ई-चालान अद्याप थकीत! Vehicle RC and driving license to be linked with Aadhaar

बातमीप्रमाणे सुतगिरणी चौक ते कुपवाड रोड परिसरात जावून सापळा लावून थांबले असता बातमीप्रमाणे रोडचे कडेला एक इसम मोटार सायकलवर बसलेला दिसला. तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने मोटार सायकलसह ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मेहंदी हसन अक्रम अली सय्यद, (वय – ३८ वर्षे, रा- चिद्रीरोड हुसेणी कॉलनी, चदरी, बिदर, राज्य कर्नाटक) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे पँटचे खिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले. त्यास सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, सांगली येथील त्रिकोणी बागेजवळ, नागराज कॉलनी, मिरज येथील अंबाबाई रेसीडेन्सी समोरून व ब्राम्हणपुरी पोस्ट ऑफिस, मिरज येथून महिलांच्या गळयातून जबरी चोरी केलेले दागिने असल्याची कबुली दिली.

अटक आणि जप्त मुद्देमाल
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मेहंदी हसन सय्यद याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्या खिशातून सोन्याचे दागिने आणि ₹६५,००० किंमतीची होंडा मोटारसायकल मिळाली. त्याने सांगली, मिरज आणि कर्नाटकमधील विविध ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली.

आरोपीविरुद्ध दाखल गुन्हे
– विश्रामबाग पोलीस ठाणे – गु.र.नं. ४४१/२०२४ आणि ३४९/२०२४
– मिरज शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. ३०४/२०२४ आणि २६३/२०२४

पुढील तपास
आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड मोठा असून, त्याच्याविरोधात मुंबई व कर्नाटकातही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे.

हे देखील वाचा: जेव्हा पृथ्वीवर येईल प्रलय, मनुष्यजात होईल नष्ट, तरीही हा एकमेव जीव राहील जिवंत! अन्न आणि पाण्याशिवाय तब्बल 30 वर्षे जगू शकणाऱ्या प्राण्याविषयी जाणून घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *