सांगलीत (sangli) तरुणावर बलात्कारासह ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा
सांगली,(आयर्विन टाइम्स) :
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा, मुलगी गर्भवती असल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी पीडितेने सांगली (sangli) तील विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित अभय शिवाजी वडार (वय २२, इस्लामपूर, ता. वाळवा) याला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कारासह ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित अल्पवयीन मुलगी शहरात राहते. संशयित अभय वडार हा पीडितेच्या ओळखीच्या असल्याने तो वारंवार पीडितेच्या घरी येत होता. सप्टेंबर ते डिसेंबर २०२३ व १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अभय याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले.
यातून पीडिता गर्भवती राहिली. तिने रविवारी (ता. ३) मुलीला जन्म दिला. त्यानंतर पीडितेने संशयित अभय वडार विरोधात (sangli) विश्रामबाग पोलिसांत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित अभयला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल ‘पोक्सो’ अंतर्गत केला आहे.”
म्हैसाळला तपासणी नाक्यावर पाच लाख रुपये जप्त
सांगली (sangli) जिल्ह्यातील म्हैसाळ (ता. मिरज) येथील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मिरज – कागवाड राष्ट्रीय महामार्गावरील चेकपोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ५ लाख १९ हजार ६०० रुपयांची रोकड जप्त केली. या पथकात वनविभाग, राज्य उत्पादन शुल्क, महसूल विभाग व पोलिसांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सीमेवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. रविवारी येथे कर्नाटक बस (केए २३ एफ ०८४४) मधून एक जण प्रवास करत होता. म्हैसाळ येथे चेकपोस्ट वर स्थिर सर्वेक्षण पथक बसमध्ये तपासणी करत असताना ५ लाख १९ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम आढळली. स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी रक्कम जप्त केली.
स्थिर सर्वेक्षण पथकांचे प्रमुख महेशकुमार लांडे, सुनील कोरे, पोलिस अधिकारी महेश माने, पोलिस नाईक दीपक कांबळे, प्रवीण खंचनाळे उपस्थित होते. मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी
केली.
बंद घरातून १२ तोळे सोन्यासह रोकड चोरीस; सांगलीतील प्रकार; ७ लाखांच्या ऐवजावर डल्ला
सांगली (sangli) येथील कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ राहणाऱ्या व्यापाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्याने १२ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पावणेदोन लाख रुपये अशा सुमारे ७ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. शिवाजी संपतराव कदम (वय ४५, सावर्डेकर प्लॉट, सुभाषनगर, आकाशवाणीमागे, सांगली – sangli)) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला. ऐन दिवाळीत झालेल्या घरफोडीने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, शिवाजी कदम व्यावसायिक आहेत. शनिवारी (ता. २) सायंकाळी सहाच्या सुमारास कदम कुटुंबीय अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे मूळ गावी दिवाळी, यात्रेनिमित्त गेले होते. त्यामुळे घराला कुलूप होते. चोरट्याने बंद घर हेरून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. बेडरूममध्ये प्रवेश केला.
तेथील लोखंडी कपाटात लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांना थेट हात घातला. चार तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या, सोन्याचा नेकलेस, कानातील झुबे, सोन्याची अंगठी, तीन घड्याळे, चांदीची मूर्ती आणि रोख पावणेदोन लाख रुपये असा सुमारे ७ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्याने पलायन केले.
गावी गेलेले कदम कुटुंबीय काल सायंकाळी सव्वासात वाजता घरी परतले, तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ सांगली (sangli) शहर पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही फुटेज मिळते काय,
याचा तपास केला. परंतु त्यात फारसे यश आले नाही.
सांगली (sangli) जिल्ह्यातील जायगव्हाण येथे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह
जायगव्हाण (ता. कवठेमहांकाळ) येथील विहिरीमध्ये कुची येथील एकाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. हा प्रकार शनिवारी (ता. २) दुपारी चारच्या दरम्यान उघडकीस आला. याची नोंद पोलिसांत झाली आहे. याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, जयवंत ज्ञानू कोळी (वय ५५, रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) यांची गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर लोकरेवाडी जयवंत कोळी गावानजीक शेती आहे.
या शेतीमध्ये त्यांनी लहानसे पत्र्याचे शेड बांधून पत्नी व मुलगा यांच्यासह राहत होता. २२ ऑक्टोबरच्या दरम्यान, ‘गावात काम आहे जाऊन येतो,’ असे सांगून सकाळी दहाच्या दरम्यान ते घरातून बाहेर पडले. दरम्यान, वडील अजून कसे काय घरी आले नाहीत, म्हणून मुलगा कुची येथे जयवंत कोळी यांना पाहण्यासाठी गेला, परंतु त्याला गावात वडील दिसून आले नाहीत. शेवटी नातेवाईक व मित्र यांच्याकडे चौकशी केली तरीदेखील सापडले नाहीत. अखेर कवठेमहांकाळ पोलिसांत जयवंत कोळी बेपत्ता
असल्याची फिर्याद दिली होती.
दरम्यान, कुची ते वडगाव रस्त्यालगत जायगव्ह हद्दीमध्ये चंदू ढोबळे यांच्या शेतातील पूर्ण पाण्याने भरलेल्या विहिरीमध्ये शेतकरी बैलजोडी घेऊन पाणी पाजण्यासाठी गेले असता त्यांना वाहत्या पाण्यातून मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याची फिर्याद जायगव्हण पोलिसपाटील दीपक पाटील यांनी दिली. अधिक तपास पोलिस करीत आहेत.