अघोरी पूजा

सारांश: सांगलीतील कसबे डिग्रज येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माहितीवरून पोलिसांनी अघोरी पूजा करणाऱ्या भोंदू मांत्रिकावर धाड टाकून त्याला रंगेहात पकडले. काळी जादू, करणीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करून महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात यांनी नागरिकांना अशा भोंदू बाबांच्या फसवणुकीला बळी न पडण्याचे आणि संशयास्पद प्रकार पोलिसांकडे त्वरित कळवण्याचे आवाहन केले.

अघोरी पूजा

सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे एका भोंदू मांत्रिकाला अघोरी पूजा करताना पोलिसांनी रंगेहात पकडले. मांत्रिक बाबूजी लखनऊ याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) सांगली शाखेच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

हेदेखील वाचा: bollywood news: सलमान खानचा ‘सिकंदर’, आलिया भट्टची ‘अल्फा’, ऋतिक रोशनचा ‘वॉर-2’ आणि ‘हाऊसफुल 5’ हे चित्रपट आहेत आधीच चर्चेत; या वर्षी प्रेक्षकांना मिळणार मोठ्या पडद्यावर मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी

गुप्त तपासणी आणि सापळा रचण्याची यशस्वी योजना
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्याकडे मागील आठवड्यात बिराप्पा पांडेगावकर यांनी बाबूजी लखनऊ या भोंदू बाबाविरोधात तक्रार केली होती. तक्रारीनुसार, करणी उतरवण्यासाठी ९ हजार रुपयांचा खर्च येईल आणि शनिवारी मध्यरात्री विशेष पूजा करावी लागेल, असे भोंदू बाबाने सांगितले.

अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदाराला डमी ग्राहक बनवून भोंदू बाबासोबत पूजा करण्यासाठी बोलावले. पोलिसांनीही सतर्कतेने तयारी ठेवली होती. मध्यरात्री, बाबूजी लखनऊ हा कसबे डिग्रज येथे अघोरी पूजा करण्यासाठी पोहोचला.

अघोरी पूजा

अघोरी पूजेदरम्यान पोलिसांची धाड
काळी बाहुली, लिंबू, पिना, उदी यांचा वापर करून होम पेटवून तो मांत्रिक पूजा करत होता, त्याच वेळी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीआय किरण चौगुले यांना माहिती मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक घाडगे यांना त्वरित कारवाईसाठी पाठवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बाबूजी लखनऊ याला रंगेहात पकडले आणि सर्व पूजेसाठी वापरलेले साहित्य जप्त केले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

हेदेखील वाचा: umadi crime news: उमदी पोलीस ठाणे हद्दीतील करेवाडी येथे मोरया ज्वेलर्समधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्यीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक; 96 हजारांचे दागिने हस्तगत

जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
सकाळी त्याच्यावर महाराष्ट्र जादूटोणा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. करणी, भानामती, काळी जादू यांची भीती घालून लोकांच्या मनात दहशत निर्माण करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

अघोरी पूजा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राहुल थोरात म्हणाले, “जगात कोणालाही करणी करता किंवा उतरवता येत नाही. करणी ही एक कपोलकल्पित गोष्ट आहे. नागरिकांनी अशा भोंदू बाबांच्या थापांना बळी पडू नये. जर कुणी अशा प्रकारची फसवणूक करत असेल, तर तातडीने अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांकडे तक्रार करावी.”

नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज
या घटनेमुळे पुन्हा एकदा भोंदू बाबांच्या फसवणुकीचे प्रकार उघड झाले आहेत. अनेकजण अंधश्रद्धेमुळे भोंदूगिरीला बळी पडतात, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या अमानवी प्रथांपासून दूर राहावे आणि कायद्याने योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *