सांगली

आयर्विन टाइम्स / सांगली
सांगली शहर परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तीन सराईत आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत एकूण ३८,६४,६३०/- रुपये किमतीचा मुद्देमाल, ज्यात ५१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि १६६५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आहेत, हस्तगत करण्यात आले आहे.

सांगली घरफोडीतील आरोपींची ओळख

आरोपींची नावे तौफीक सिकंदर जमादार (३१ वर्षे), समीर धोडींबा मुलाणी (३१ वर्षे), आणि दिपक पितांबर कांबळे (२७ वर्षे) अशी असून तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. हे सर्व आरोपी घरफोडी चोरीमध्ये सराईत आहेत.

सांगली

चोरीचा कालावधी आणि गुन्ह्याची तपशीलवार माहिती

चोरीची घटना ३ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता ते ५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९:१५ वाजेच्या दरम्यान घडली होती. फिर्यादी प्रशांत प्रदिपकुमार आडसुळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सांगली पोलिसांनी तपास सुरू केला.

हे देखील वाचा: Shocking: जत तालुक्यातील उमदी येथे पत्नी नांदायला येत नसल्याने सासरवाडीत एकाने केली आत्महत्या: घराबाहेर घेतले पेटवून

कारवाईचे तपशील

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून या तिन्ही आरोपींना हरीपुर जुना रस्त्याजवळून पकडले. त्यांच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या युनीकॉर्न मोटार सायकलवरून आरोपी चोरीचे सोने व चांदी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.

जप्त केलेला मुद्देमाल

या कारवाईत ३६,२५,०००/- रुपये किमतीचे ५१६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि १,५९,६३०/- रुपये किमतीचे १६६५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. त्याशिवाय ८०,०००/- रुपये किमतीची काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटार सायकलही जप्त करण्यात आली.

हे देखील वाचा: Kasegaon murder: अनैतिक संबंधाचा संशयावरून कासेगाव येथील सावकाराचा खून सुपारी देऊन : तिघांना अटक; 50 हजारांना घेतले पिस्तूल

सांगली

आरोपींचा गुन्हेगारी इतिहास:

तौफीक जमादार हा आधीपासूनच रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सांगली जिल्ह्यात त्याच्यावर घरफोडी आणि मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच, समीर मुलाणीवर सातारा जिल्ह्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. या आरोपींनी कबूल केले की, ते हरिपूर गावात ६ महिन्यांपासून चोरी करत होते.

हे देखील वाचा: डासांपासून होणाऱ्या आजारांपासून सुटका कशी करायची? मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यू या 3 आजारांची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध उपाय जाणून घ्या

सदर प्रकरणी अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाद्वारे सुरू आहे. सांगली शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्याच्या दिशेने ही मोठी कारवाई मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !