सांगली अपघात: जत तालुक्यातील ७, तासगाव तालुक्यातील १ महिला, आणि कुपवाड येथे १ बालकाचा समावेश

सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सांगली जिल्ह्यासाठी शनिवार अत्यंत दुर्दैवी ठरला. विविध ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांमध्ये एकूण ९ जणांचा मृत्यू झाला. यात जत तालुक्यातील ७, तासगाव तालुक्यातील १ महिला, आणि कुपवाड येथे १ बालकाचा समावेश आहे. या अपघातांनी संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सांगली

जत तालुक्यातील अपघात: मोरबगी गावावर शोककळा

आजारी वडिलांना भेटण्यासाठी बंगळूरहून मोरबगी (ता. जत) गावाकडे निघालेल्या कारवर कंटेनर उलटून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

चंद्राम इरगोंड एगाप्पागोळ ( वय ४५), पत्नी गौराबाई, मुलगा जॉन, मुलगी दीक्षा व चंद्राम यांच्या भावाची पत्नी विजयलक्ष्मी मल्लिनाथ एगाप्पागोळ व मुलगी आर्या (वय ६, सर्व सध्या रा. बंगळूर, मूळ रा. मोरबगी, ता. जत, जि. सांगली) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. शनिवारी (ता. (२१) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्ग (क्र. ४) वरील नेलमंगल, बेगुरजवळील तळकेरे गावात हा अपघात झाला. या घटनेने मोरबगी गावावर शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा: महाराष्ट्र मंत्रिमंडळ: फडणवीस यांच्याकडे गृह, शिदे नगरविकास, अजित पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालय; महायुतीचे अखेर 8 दिवसांनंतर खाते वाटप जाहीर; जाणून घ्या कोणाला मिळाले कोणते खाते…

दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याने तळेकेरे गावापासून पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी क्रेन बोलावून कंटेनर मोटारीवरून बाजूला केला. चार ते पाच तास वाहनांना हटविण्यासाठी पोलिसांची मोठी कसरत सुरू होती. या घटनेची नेलमंगल पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

सांगली

अधिक माहिती अशी की, चंद्राम एगाप्पागोळ यांनी अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून सॉप्टवेअर इंजिनिअरची पदवी संपादन केली होती. ते बंगळूर येथील खासगी कंपनीमध्ये नोकरी केली. त्यानंतर काही वर्षांपूर्वी चंद्राम एगाप्पागोळ यांनी आपली नोकरी सोडून बंगळूर व गुजरात येथे स्वतःची सॉप्टवेअर कंपनी सुरू केली होती. त्यांचे बंधू मल्लिनाथ एगाप्पागोळ हे देखील डॉक्टर म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. या धावपळीच्या जीवनात चंद्राम हे महिन्यातून एकदा आई-वडिलांना भेटण्यासाठी आपल्या मोरबगी गावी येत होते.

गावी वडील आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी आपल्या मोटारीतून ( १, एनडी १५३६) चंद्रा हे पत्नी, मुलगा, मुलगी, भावाची पत्नी व सहा वर्षांची मुलगी यांना घेऊन बंगळूरहून सकाळी मोरबगी गावी निघाले होते. त्यांची गाडी नेलमंगल येथील बेरजवळील तळ गावाजवळ आली असता, बंगळूरच्या दिशेने निघालेल्या कंटेनरवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व कंटेनर रस्ता ओलांडून त्यांच्या मोटारीवर उलटली. एका क्षणात चंद्राम यांचे कुटुंब मृत्यूच्या खाईत लोटले गेले.

हे देखील वाचा: sangli crime news: सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याची कामगिरी: अट्टल मोटारसायकल चोरट्याला अटक; 5 दुचाकी जप्त

ढालगाव-डोर्ली मार्गावर महिला ठार

कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे सुभद्रा ठोंबरे (५४) या महिलेचा मोटारसायकलवरून पडल्याने मालवाहतूक ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. त्या पतीसोबत अंत्यविधीसाठी जात होत्या. पती मात्र सुखरूप राहिले.

याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ढालगाव ते डोर्लीीं रस्त्यावर मायाक्का मंदिराजवळच मालवाहतूक ट्रक (एमएच १३, डी क्यू ७३८७) ढालगावकडून जत तालुक्यातील डोर्लीीं गावाकडे जात होता. त्याच्या पाठीमागे आणखी एक गाडी होती, तर डोर्लीीं येथील रहिवासी पती अण्णा ठोंबरे व पत्नी सुभद्रा ढालगावच्या दिशेने मोटारसायकलवरून (एमएच ४६, सी एफ ९१०९) जात होते.

सांगली

मायाक्का मंदिराजवळच मोटारसायकल घसरून पत्नी खाली पडली आणि थेट ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली गेली. चाकाखाली डोके सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, या अपघातात मात्र पतीला कोणतीही इजा झाली नाही.

ठोंबरे कुटुंबीयांचे गाव डोर्ली आहे. पती मुंबई येथे नोकरीस होते. सेवानिवृती झाल्यानंतर ते डोर्लीीं व मुंबई येथे वास्तव्यास असतात. ते दोन दिवसांपूर्वी चोरोची येथे लग्न समारंभ कार्यक्रमासाठी आले होते. दरम्यान, शुक्रवारीच चोरोचीत एका नातेवाईकाचे निधन झाल्याने साडेसातच्या सुमारास चोरोचीला एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असतानाच घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सांगलीतील कुपवाड येथे दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

सांगलीतील कुपवाडमधील अहिल्यानगर झोपडपट्टी मार्गावर अवजड डंपरने धडक दिल्याने मनोज ऐवळे (२ वर्षे) या बालकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी वाहनावर दगडफेक केली. पोलिसांनी चालकाला अटक केली असून, परिसरातील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा मुद्दा पुढे आला आहे.

सांगली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज हा सांगलीतील कुपवाडमधील अहिल्यानगर झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास आहे. शनिवार सकाळी घरासमोरील मुख्य रस्ता पार करत असताना माधवनगरच्या (ता. मिरज) दिशेने आलेल्या अवजड वाहनाची (एमएच १०, डीटी ४४४७) त्याला धडक दिली. शरीरावरून वाहनाचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर भयभीत चालक ताब्यातील वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाला.
यावेळी जमलेल्या बघ्यांनी मात्र वाहनावर दगडफेक करून काच फोडली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी मनोजला आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हे देखील वाचा: kadegaon crime news: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणची कौतुकास्पद कामगिरी: वयोवृद्ध इसमास बांधून जबरी चोरी करणाऱ्या 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या: पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार

नागठाणे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत शारदा पाटील (५५) यांचा जागीच मृत्यू झाला. त्या वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होत्या.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज दुपारी ३.४५ च्या सुमारास दुचाकीवरून (एमएच १०, बी व्ही ५९३) शारदा पाटील अंकलखोपच्या बाजूने वाळव्याकडे जात असताना नागठाणे येथील उदय वसंतराव पाटील यांच्या शेताजवळ आल्या असता, अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, शारदा पाटील यांचा अपघात स्थळावरच मृत्यू झाला. यांच्या तोंड आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह भिलवडी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिस व वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शारदा पाटील, वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी होत्या. कवठे एकंदहून त्या वाळवाकडे परत येत होत्या. भिलवडी पोलिस तपास करीत आहेत.

अपघातांचे धोरण व सावधानता गरजेची

सांगली जिल्ह्यातील या दुर्दैवी घटनांनी वाहतूक सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. अवजड वाहनांच्या बेजबाबदार वागणुकीसह रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि अरुंद रस्ते हे मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. स्थानिक प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !