राजकमल एंटरटेनमेंट

‘राजकमल एंटरटेनमेंट’ या नव्या प्रॉडक्शन हाऊस

‘राजकमल एंटरटेनमेंट’ या नव्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे एक नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या प्रॉडक्शन हाऊसचे मालक राहुल शांताराम हे दिग्गज चित्रपती व्ही. शांताराम यांचे नातू आणि किरण शांताराम यांचे चिरंजीव आहेत. आपल्या आजोबांच्या वारशातून प्रेरणा घेत, राहुल यांनी दर्जेदार आणि प्रेक्षकप्रिय चित्रपटांची निर्मिती करण्याचा निर्धार केला आहे.

राजकमल एंटरटेनमेंट

आगामी चित्रपटामध्ये अनेक वर्षांनी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते ही लोकप्रिय जोडी एकत्र दिसणार आहे. चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर करण्यात आलेले नसले तरी, थोडी खट्याळ, थोडी हळवी आणि गोंडस अशी ही कथा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश गुप्ते करत आहेत.

हे देखील वाचा: भारतातील सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट: ‘पुष्पा 2’ मोडणार ‘दंगल’चा विक्रम? सर्वाधिक कमाई करणारे पहिले पाच चित्रपट कोणते जाणून घ्या

अभिनेते अशोक सराफ यांची प्रतिक्रिया

“खूप काळानंतर एक सशक्त भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. चित्रपटाची कथा वर्तमान काळाशी जोडलेली असून, दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांनी उत्कृष्टपणे ती सादर केली आहे. वंदना गुप्तेसोबत काम करताना आम्हा दोघांमध्ये असलेले उत्कृष्ट टायमिंग या चित्रपटाला आणखी उठावदार बनवते. निर्माते राहुल शांताराम यांचे समर्पण पाहून खूप अभिमान वाटतो. त्यांच्या या प्रयत्नांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी निश्चितच खास ठरेल.”

राजकमल एंटरटेनमेंट

वंदना गुप्ते यांचे मत

‘राजकमल एंटरटेनमेंट’सोबत काम करणे खूप आनंददायी आहे. अशोक सराफ यांच्यासारख्या गुणी अभिनेत्यासोबत काम करताना नेहमीच समाधान मिळते. या चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूप सकारात्मक होता. प्रेक्षकांशी पुन्हा भेटण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

हे देखील वाचा: A multi-faceted actress: शर्मिला टागोर: बहुआयामी आदाकारा; 8 डिसेंबर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चमकदार कारकिर्दीचा आढावा

दिग्दर्शक लोकेश गुप्ते म्हणतात

“या चित्रपटाद्वारे अशोक सराफ आणि वंदना गुप्तेसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल, असा विश्वास आहे.”

‘राजकमल एंटरटेनमेंट’चा हा नवा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरेल.

-गणेश तळेकर, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !