डाळिंबाचा खर्च वजा जाता साडेपंधरा लाखांचा निव्वळ नफा
आयर्विन टाइम्स / पुणे
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील रोहिदास शशिकांत कुंभार या शेतकऱ्याच्या ५० गुंठे क्षेत्रातील डाळिंबाला जागेवर १९१ रुपयांचा भाव मिळाला. तो भाव सध्या शिरूर तालुक्यात विक्रमी आहे. त्यापासून त्यांना १९ लाख रुपये मिळाले असून खर्च वजा जाता त्यातून सुमारे साडेपंधरा लाखांचा निव्वळ नफा झाला आहे.याची चर्चा सध्या जिल्हाभर सुरू आहे.
आधुनिक शेतीची कास
यंदाच्या हंगामात डाळिंबाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे बांगलादेशच्या बाजारपेठेत डाळिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळेच या फळाला इतका उच्च दर मिळाला आहे.
अलीकडच्या काळात पुणे परिसरातील शेतकरी ऊसाकडे दुर्लक्ष करून डाळींब पिकाकडे वळला आहे. या परिसरात पहिल्यांदा भीमा नदी असल्याने ऊस पिकाचे क्षेत्र प्रचंड वाढले आहे. मात्र तरीही या परिसरात डाळींबाच्या बागा वाढत आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील युवा शेतकरी रोहिदास कुंभार यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे ठरवले.
५० गुंठे क्षेत्रामध्ये भगवा जातीची ५०० डाळिंबाची झाडे
त्यांनी सर्व अभ्यास करून तसेच माहिती घेऊन मांडवगण फराटा या गावाशेजारी २०२२ मध्ये डाळिंब पिकासाठी सहा ट्रॉली शेणखत टाकून बेड तयार केला. प्रमुख पीक आहे. मात्र, गेल्या काही डाळिंबाच्या दोन झाडांतील अंतर सुमारे दिवसांपासून येथील शेतकरी हा डाळिंब आठ फूट असून, दोन ओळीतील अंतर साडेतेरा फूट आहे. झाडांच्या वाढीसाठी पुरेशी आणि खेळती हवा मिळत आहे. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य प्रकारे मशागत केली होती. ५० गुंठे क्षेत्रामध्ये भगवा जातीची ५०० या पिकाची झाडे लावली आहेत. यावर्षी दुसऱ्या बहरात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी डाळिंबाची बाग फुलवली आहे.
रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने पीक घेतल्यामुळे त्यांच्या बागेला अतिशय मोहक आणि दर्जेदार फळे लागली. त्यामुळे परराज्यातून व्यापारी त्यांच्या शेतात पोचले. त्यांच्या मालासाठी व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ निर्माण झाल्याने श्रीगोंदा येथील व्यापाऱ्याने त्यांच्या डाळींबाला चांगला भाव दिला.
तेल्या व मर रोगाच्या संकटामुळे डाळिंब बागायतदार संकटात
तेल्या आणि मर रोगाच्या संकटामुळे बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना, या कठीण परिस्थितीत डाळिंबाच्या रोपांचे योग्य नियोजन व निगा राखून बाग वाढवली, आणि त्यामुळे आम्हा कुटुंबीयांना चांगले फळ मिळाले आहे. मांडवगण फराटाचे शेतकरी रोहिदास कुंभार यांच्या या या फळाला व्यापाऱ्याने १९१ रुपये इतका भाव दिला, ज्यामुळे शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले. अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
या भागातील कृषी सहाय्यक महादेव गदादे यांनी सांगितले की , शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील तांदळी गणेगाव मांडवगण फराटा, इनामगाव या गावांतील अनेक शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळाले आहेत. डाळिंब पिकातून अधिकचे दोन पैसे जास्त मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होत आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि अचूक पाणी नियोजन केले, तसेच बाबीकडे लक्ष दिल्यास या पिकाचे उत्तम उत्पादन आणि गुणवत्ता मिळण्यास मदत होईल.
सव्वा एकरात १९ लाखांचे उत्पन्न
मांडवगण येथील कुंभार कुटुंबीयांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. श्रीगोंदा येथील व्यापाऱ्यांनी ही बाग जागेवर खरेदी केली. त्यामुळे त्यांना ५० गुंठ्यांत खर्च वजा जाता साडेपंधरा लाखांचे या पिकातून उत्पन्न मिळाले. त्यासाठी त्यांचा तीन लाख तीस हजार रुपये खर्च आला, परंतु त्यातून त्यांना कितीतरी पटीने फायदा झाला आहे. डाळिंब शेती करण्यासाठी कुंभार यांना राजकुमार जाधव आणि सार्थक ॲग्रो मांडवगण फराटा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.