सारांश: मिरज येथे मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून ६ मोटारसायकली (किंमत २ लाख रुपये) जप्त करण्यात आल्या. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. आरोपींनी सांगली व इस्लामपूर येथे देखील चोरी केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल गुरव करीत आहेत.
मिरज,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून एकूण ६ मोटारसायकली (किंमत २ लाख रुपये) जप्त करण्यात आल्या आहेत. रमेश ऊर्फ शुभम प्रमोद कांबळे (वय २४, रा. नदीवेस बौद्ध वसाहत, मिरज), प्रथमेश बाबासो सुर्वे (वय २५, रा. बहे-नरसिंगपूर, ता. वाळवा, जि. सांगली) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
गुन्ह्याची हकिकत:
दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ७.४६ वाजता पोलिसांना माहिती मिळाली की, मिरज-कोल्हापूर रोडवरील ब्रिजखाली दोन इसम चोरीच्या मोटारसायकलींसह थांबले आहेत. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून ६ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
हस्तगत मुद्देमाल:
➡ ६ मोटारसायकली (एकूण किंमत : २,००,००० रुपये)
१) हिरो एचएफ डिलक्स (काळा-निळा)
२) हिरो स्प्लेंडर प्लस (काळा-निळा-लाल)
३) हिरो स्प्लेंडर (काळा-निळा-लाल)
४) हिरो पॅशन प्रो (लाल-काळा)
५) सुपर स्प्लेंडर (सिल्वर)
६) होंडा शाईन (बिना क्रमांकाची)
गुन्हे उघडकीस आले:
🔹 महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे – गु.र.नं. ४५/२०२५, ५५/२०२५
🔹 सांगली ग्रामीण पोलीस ठाणे – गु.र.नं. ४३३/२०२४
🔹 इस्लामपूर पोलीस ठाणे – गु.र.नं. २९२/२०२४
पोलिसांची कामगिरी:
सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितु खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
अधिक तपास:
सदर आरोपींना १९ मार्च २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल गुरव करीत आहेत.