गोवा

गोवा बनावटीची विदेशी दारू विक्री होत असल्याचा सुगावा

आयर्विन टाइम्स / सांगली
महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘ड्राय डे’च्या पार्श्वभूमीवर सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिरजेत कारवाई करत गोवा बनावटीची विदेशी दारू मोठ्या प्रमाणात जप्त केली आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी प्रकाश यशवंत खोत (वय ५२, रा. शिवशंकर वसाहत, सुभाषनगर, मिरज) याच्याकडून एकूण ४१,२१० रुपयांची दारू हस्तगत करण्यात आली.

गोवा

जाणून घ्या घटनाक्रम

दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी, महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी ‘ड्राय डे’ असल्याने सांगलीच्या पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलीस कॉन्स्टेबल इम्रान मुल्ला आणि संकेत मगदूम यांना त्यांचे खबऱ्याकडून माहिती मिळाली की, प्रकाश खोत हा आपल्या राहत्या घरासमोर गोवा बनावटीची विदेशी दारू विक्री करीत आहे.

हे देखील वाचा: Sangli crime news : सांगली पोलिसांकडून दिवसा घरफोडी करणारा आंतरराज्य चोरटा जेरबंद; 4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

कारवाईचा तपशील

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सुभाषनगर येथे सापळा रचला. संशयास्पद व्यक्ती गोणी घेऊन बसलेली दिसली. त्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव प्रकाश खोत असल्याचे सांगितले. त्याच्या जवळील गोणीची तपासणी केली असता गोवा बनावटीची विदेशी दारू आढळून आली. पुढील तपासात त्याने घराच्या मागील झाडीत लपवलेली अधिक दारू काढून दिली.

हे देखील वाचा: crime news : स्कूलबसमध्येच 2 मुलींवर अत्याचार: पुण्यातील वानवडी परिसरातील घटना; चालक अटकेत

जप्त दारूचा तपशील

1. गोवा बनावटीची विदेशी दारू ७५० मिलीच्या १६३ बाटल्या, किमती ३९,५६० रुपये
2. गोवा बनावटीची विदेशी दारू १८० मिलीच्या ११ बाटल्या, किमती १,६५० रुपये
एकूण किमत ४१,२१० रुपये

सदर कारवाई नंतर प्रकाश खोतविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे.

हे देखील वाचा: Blog writing: ब्लॉग लिहायचा आहे का? मग हे 13 टिप्स तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील! जाणून घ्या विषयाच्या निवडीपासून ते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !