मिरज

सारांश: मिरजच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने अंमली पदार्थविरोधी कारवाईत सातत्य राखत, १३ मार्च २०२५ रोजी गांजा विक्री करणाऱ्या तिघांविरोधात कारवाई करून ₹६७,५९० किमतीचा २.७ किलो गांजा जप्त केला. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत संशयितांना अटक करण्यात आली. याआधीही विविध छाप्यांद्वारे मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला होता. नागरिकांनी अंमली पदार्थ विक्रीविरोधात पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिरज

मिरज,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेने अंमली पदार्थ विरोधी सातत्याने कारवाई करत, १३.०३.२०२५ रोजी रात्री ८.०३ वा. रॉकेल डेपो झोपडपट्टीजवळ बंद असलेल्या रेल्वे पोलीस लाईनजवळ संशयित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. या कारवाईत, तयार गांजामालाचा २ किलो ७०० ग्रॅम वजनाचा साठा, ज्याची किंमत सुमारे ₹६७,५९०/- रु. होती, जप्त करण्यात आला.

हेदेखील वाचा: miraj crime news: मिरज येथे मोटारसायकल चोरी करणारे दोघे जेरबंद; 6 मोटारसायकली जप्त

या कारवाईचे आदेश “नशामुक्त भारत अभियान” पार्श्वभूमीवर घेऊन, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती रितू खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा व महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे काम पार पाडण्यात आले.

गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोकॉ जावेद शेख व मोसीन टिनमेकर यांना दि. १३.०३.२०२५ रोजी दोन इसम हे नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करणेसाठी मिरज येथील रॉकेल डेपो झोपडपट्टीजवळील बंद असलेल्या रेल्वे पोलीस लाईनजवळ येणार आहेत, अशी खात्रीलायक बातमी मिळाली. सदर बातमीवरून संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकास रवाना करुन सदर इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार पोलीस ठाणे डी.बी. पथकाने संशयित व्यक्तींवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईपूर्वी, १४.०२.२०२५, १८.०२.२०२५ व १०.०३.२०२५ रोजी सुद्धा अनेक थराच्या छाप्यातून गांजामाल जप्त केले गेले होते.

हेदेखील वाचा: Crisis in primary schools: नव्या संचमान्यतेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांचे शिक्षक अतिरिक्त होणार: शिक्षक संघटनांचा तीव्र विरोध; धोरण रद्द करण्याची मागणी; सांगली जिल्ह्यात 5440 शिक्षक

पोलिसांच्या कारवाईत सदर इसम हे अल्पवयीन बालके असल्याचे समजून आले. त्यांचेकडे अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदरचा तयार गांजामाल अजून एका अल्पवयीन बालकाकडून घेवून मिरज परीसरात किरकोळ स्वरुपात विक्री करुन वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी हे करीत आहेत. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद पोलीस पथकाने एक महीन्याचे कालावधीत अंमली पदार्थ विरोधी कारवाईत लक्षणीय सातत्य राखून चौथी प्रभावी कारवाई केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या सातत्यपूर्ण कारवाईद्वारे सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या विक्री व वितरणाच्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य करणे आहे. नागरीकांनाही अंमली पदार्थाबाबतची माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. miraj crime news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *