कोल्हापूर

कोल्हापूर पोलिस दलात मोठी खळबळ

कोल्हापूर,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जप्त केलेल्या आयशर टेम्पोच्या सुटकेसाठी 50 हजार रुपयांची लाच मागण्याच्या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) आणि एक पोलीस शिपाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने कोल्हापूर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर

प्रकरणाचा तपशील

तक्रारदार व त्यांचा मित्र जनावरे वाहतुकीचा व्यवसाय करतात. तक्रारदाराचा आयशर टेम्पो गांधीनगर पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केला होता. टेम्पो परत मिळवण्यासाठी तक्रारदाराने पोलिस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे यांना भेट दिली. यावेळी शिरगिरे यांनी 30 हजार रुपयांची मागणी केली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी तक्रारदाराच्या मित्राला फोन करून 35 हजार रुपयांची मागणी केली.

हे देखील वाचा: sangli crime news: सांगलीतील महिला पोलीस 50 हजारांची लाच घेताना रंगेहात सापडली

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल झाल्यानंतर पडताळणीदरम्यान शिरगिरे यांनी तक्रारदाराला पोलीस कर्मचारी संतोष कांबळे यांची भेट घेण्यास सांगितले. कांबळे यांनी शिरगिरेंना फोन करून तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. शेवटी तडजोडीने 15 हजार रुपये ठरवले.

दीपक जाधव यांनी तक्रारदाराला अटकेत असताना गुन्ह्यात मदत करण्यासाठी पैसे घेतल्याची कबुली दिली. तसेच टेम्पो सोडण्यासाठी उर्वरित 35 हजार रुपयांची मागणी केली.

हे देखील वाचा: sangli crime news: वायफळे खून प्रकरण: तिघे पुण्यातून ताब्यात; 2 पोलिस कर्मचारी निलंबित: कामेरीजवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू: मालेवाडीत जागेच्या वादातून मारहाण

लाचखोरी प्रकरणी कारवाई

या प्रकरणी लाचलुचपत विभागाने दीपक जाधव (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वय 44), आबासाहेब शिरगिरे (पोलीस उपनिरीक्षक), व संतोष कांबळे (पोलीस शिपाई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी आणि पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अॅन्टी करप्शन ब्युरो कोल्हापूरच्या पथकाने केली.

कोल्हापूर पोलिस दलाला धक्का

दोन वरिष्ठ अधिकारी आणि एका पोलिस शिपायावर गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली असून लाचलुचपतविरोधी विभागाच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

हे देखील वाचा: जत तालुक्यातील विविध बातम्यांचा आढावा जाणून घ्या: जत तालुक्यातील युवकावर अपघातप्रकारणी गुन्हा दाखल; आमदार पडळकरांचा अपेक्षाभंग; विज्ञान मेळाव्यात 88 विद्यार्थी सहभागी; गिरगाव सरपंच अपात्र…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !