तालुक्यात चार दिवसांत २ आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील खिलारवाडी येथे एकाने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली तर जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या पाटीलवस्ती नजीक एकाने आत्महत्या केली. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
जत तालुक्यातील खिलारवाडीत एकाची गळफासाने आत्महत्या
जत/ आयर्विन टाइम्स
खिलारवाडी येथे खासगी वाहन चालकाने राहत्या घरात तुळीला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. बापू बाबाजी लोखंडे (वय ४८) असे त्याचे नाव असून शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. जत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
मृताचा चुलत भाऊ कामानिमित्त बोलावण्यास गेले असता बापू यांचा मृतदेह घरात तुळईला लटकलेला आढळला. त्यांनी नागरिकांना कळविले. पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाण्यास पाठवण्यात आले. बापू वडाप चालक म्हणून ते काम करीत होते. महिन्यापूर्वी पत्नी व मुलांशी भांडण करून घरी एकटेच राहत होते.
जत मध्ये एकाची नैराश्यातून गळफासाने आत्महत्या
शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबाबाई डोंगर रस्ता पाटील वस्तीजवळ संजय आप्पा सरक (वय 50) आपल्या राहत्या मळ्यापासून थोड्या अंतरावर अंबाबाई डोंगर वन विभागामध्ये झाडास दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
अंबाबाई मंदिर रोडकडे फिरायला जाणाऱ्या मुलांनी झाडाला लटकलेला मृतदेह पाहिला. त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना कळविले. नागरिकांना ओळख पटताच नातेवाईकांना सदर घटना कळविली.
नातेवाईकांनी घटनेची माहिती पोलीसांना भ्रमणध्वनी व्दारे दिली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला. मयत मयत संजय सरक यांची शेती असून शेतीसह ऊसतोड मजूर म्हणून ते काम करीत होते. परंतु आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.