jat news: ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने शेगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन शिबिर व चंद्रभागा नेत्रालयाच्या सहकार्याने 102 नागरिकांची मोफत डोळे तपासणी. पेन्शन, शासकीय योजना व कायदेशीर हक्कांबाबत माहिती.
जत | आयर्विन टाइम्स प्रतिनिधी :
ओम साई प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने शेगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन शिबिर व मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन, विविध शासकीय योजना, कायदेशीर अधिकार व सामाजिक सुरक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ओम साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण व त्यांच्या टीमने उपस्थित सर्व नागरिकांना योजनांची माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितली. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ओम साई प्रतिष्ठान व सर्व सहकारी मिळून आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

१०२ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी
या उपक्रमाअंतर्गत चंद्रभागा नेत्रालय यांच्या सहकार्याने १०२ नागरिकांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. तानाजी वाघमोडे व त्यांच्या संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. आवश्यक असलेल्या रुग्णांसाठी मापक दरात शस्त्रक्रिया करून देण्यात येतील, असेही यावेळी सांगण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या शिबिरास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण व त्यांचे सहकारी, शेगावचे माजी सरपंच लक्ष्मण बोराडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादा पाटील, असलम मुजावर, तसेच ओम साई प्रतिष्ठानचे समाधान माने, चंद्रकांत शिंदे, बबलू शिंदे, जितेंद्र बोराडे, दीपक बुरुटे, किरण निकम यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे सदस्य, महिला व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
ओम साई प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य, माहिती व मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
A Senior Citizens Guidance and Free Eye Check-up Camp was organized at Shegaon by Om Sai Pratishthan, a social organization. The camp provided senior citizens with information about pension schemes, government welfare programs, legal rights, and social security.
The guidance session was conducted by Mr. Yashwantrao Chavan, President of the Jat Taluka Senior Citizens Association, along with his team, who assured continued support to elderly citizens. With the support of Chandrabaga Eye Hospital, 102 citizens underwent free eye examinations. Dr. Tanaji Waghmode and his medical team extended full cooperation and assured eye surgeries at affordable rates if required.
Several dignitaries, social workers, women, and local residents were present at the camp. The initiative received a positive response and was appreciated by the participants for its social and health benefits.

