Jat Nagar Parishad Result: जत नगरपरिषद निवडणूक 2025 चा सविस्तर निकाल. भाजपने 11 जागा जिंकून सत्ता स्थापन केली. डॉ. रविंद्र आरळी 2496 मतांनी नगराध्यक्षपदी विजयी. प्रभागनिहाय निकाल व संपूर्ण माहिती वाचा.
जत | आयर्विन टाइम्स प्रतिनिधी
जत नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा (Jat Nagar Parishad Result) निकाल जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) २३ पैकी ११ जागा जिंकत स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवली आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून, तीन फेऱ्यांमध्ये अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
या निवडणुकीत काँग्रेसने ८ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (ajit pawar)ने ३ जागा मिळवल्या, तर एका जागेवर चिठ्ठीद्वारे अपक्ष उमेदवार विजयी ठरला.

नगराध्यक्षपदी डॉ. रविंद्र आरळी यांचा दणदणीत विजय
नगराध्यक्षपदासाठी एकूण सात उमेदवार रिंगणात होते. भाजपचे डॉ. रविंद्र आरळी यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेत अखेर २४९६ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.
नगराध्यक्षपदाचे निकाल (मतसंख्या):
- डॉ. रविंद्र आरळी (भाजप) – ९११२ (विजयी)
- सुजय शिंदे (काँग्रेस) – ६६१६
- सुरेश शिंदे (राष्ट्रवादी) – ३४७०
- सलीम गवंडी (शिवसेना) – ८६४
- अर्जुन कुकडे (मार्क्सिस्ट) – ११४
- नवनाथ पवार (अपक्ष) – १०६
- मल्लिकार्जुन हत्ती (अपक्ष) – ६८
- नोटा – ११४
डॉ. आरळी यांनी पहिल्या फेरीत ८९९, दुसऱ्या फेरीत १२४७ आणि तिसऱ्या फेरीत ३५० मतांचे आघाडी मिळवत विजय निश्चित केला.
२३ जागांसाठी ९४ उमेदवार रिंगणात
या निवडणुकीत २३ जागांसाठी तब्बल ९४ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या, तर काही ठिकाणी अत्यल्प मतांच्या फरकाने निकाल लागले.
विशेष म्हणजे प्रभाग १० अ मध्ये अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ हे भाजपच्या उमेदवाराइतकीच (४६६) मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे विजयी ठरले, ही बाब चर्चेचा विषय ठरली.

प्रभागनिहाय निकालांचा आढावा
नगरपरिषद निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील चुरशीच्या लढतीत अनेक ठिकाणी मतदारांनी पक्षांपेक्षा उमेदवारांना पसंती दिल्याचे चित्र दिसून आले. काही प्रभागांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने वर्चस्व राखले, तर अनेक ठिकाणी भाजपने आपली ताकद सिद्ध केली.
महिला उमेदवारांचा सहभाग व विजय हे या निवडणुकीचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य ठरले.
■ २३ जागेसाठी ९४ उमेदवार रिंगणात■
■ प्रभाग १ अ-
राजकुमार साळे (भाजप) – ९९३ विजयी
योगेश कांबळे (राष्ट्रवादी) – ७१२
महेश साबळे (काँग्रेस)- ८३
दिलीप चव्हाण (शिवसेना) – १९
नोटा- २४
◆ प्रभाग १ ब-
लक्ष्मीबाई आण्णाप्पा कैकाडी (भाजप)- ८६० विजयी
मेघा संतोष देवकर (राष्ट्रवादी)- ८५०
रंजना गोविंद पवार (काँग्रेस) – १०६
नोटा- १५
■ प्रभाग २ अ-
प्रमोद हिरवे (भाजप)- ६२६ विजयी
महादेव कोळी (काँग्रेस)- ४९३
शरणाप्पा अक्की ( राष्ट्रवादी) १६६
श्रावण चौगुले (शिवसेना)-११
नोटा- १२
◆प्रभाग २ ब-
डॉ. विणा शंकर तंगडी (भाजप)- ६२५ विजयी
गौरी प्रशांत पाटील (राष्ट्रवादी)- ३२४
शोभा इराण्णा निडोणी (काँग्रेस)- ३४३
नोटा-१०
■ प्रभाग ३ अ-
सिमा संतोष पट्टणशेट्टी (भाजप)- ७९३ विजयी
हेमा शरद चव्हाण (राष्ट्रवादी)- २०७
गिताजंली दिनेश जाधव (काँग्रेस)- ७३८
सुनंदा विजय चव्हाण (शिवसेना)-८३
नोटा-१९
◆ प्रभाग ३ ब-
गौतम ऐवाळे (भाजप)- ८७४ विजयी
धैर्यशील सावंत (काँग्रेस)-७१५
सागर चंपान्नावर (राष्ट्रवादी)- १५८
रोहित कांबळे (शिवसेना)- ६८
राहुल शिंदे (अपक्ष)- १४
नोटा-१३
■ प्रभाग ४ अ-
संतोष उर्फ भुपेंद्र कांबळे (काँग्रेस)- ९५२ विजयी
सुभाष कांबळे (भाजप)- ५८७
संतोष साबळे (बसपा-राष्ट्रवादी)- ३४२
प्रमोद सावंत (शिवसेना)- २०८
हर्षवर्धन कांबळे (रिपाइं आठवले गट अपक्ष)- १३५
नोटा-२०
◆ प्रभाग ४ ब-
निलाबाई कृष्णा कोळी (काँग्रेस)- १०९१ विजयी
तस्लिम जिलानी जमादार (बसपा-राष्ट्रवादी)- ३८५
हेमलता बसवराज चव्हाण (भाजप)- ५३३
प्रिती प्रभाकर गायकवाड (शिवसेना)- १४१
नजमा अजीज सत्ती (रिपाइं आठवले गट अपक्ष)- १४२
नोटा-१२
■ प्रभाग ५ अ-
प्रणिता गजानन यादव (भाजप)- ७४९
सारिका योगेश ऐडके (राष्ट्रवादी)- ४०५
हयातबी कासीम गवंडी (काँग्रेस)- ७६२
अश्विनी चंद्रकांत माळी (शिवसेना)- ११५
नोटा- २१
◆ प्रभाग ५ ब-
इमरान गवंडी (राष्ट्रवादी )-७४४ विजयी
युवराज निकम (काँग्रेस)- ५६३
निलेश मटगार (भाजप)- ४९८
अरशद गवंडी (शिवसेना)- १२७
नोटा-२०
■ प्रभाग ६ अ-
संगीता अविनाश सोनूले (भाजप) ९७२ विजयी
मनीषा सचिन माने ( काँग्रेस)- ३६६
शारदा अरुण कणसे (राष्ट्रवादी)- ५६१
दिपाली सुनील देवकुळे (शिवसेना)- ७७
नोटा- २९
◆ प्रभाग ६ ब-
विक्रम ताड (भाजप)- ८९० विजयी
सचिन मदने (राष्ट्रवादी)- २३९
विक्रम ढोणे (रासप-काँग्रेस)- ६९८
अनिकेत मोटे (शिवसेना)- ४५
राघवेंद्र चौगुले (अपक्ष)- ८७
संजय शितोळे (अपक्ष)- ३०
नोटा-१६
■ प्रभाग ७ अ-
अर्चना बाजी केंगार ( राष्ट्रवादी)- ७०५ विजयी
रंजना विलास बाबर (भाजप)- ४०७
स्नेहल संतोष हविनाळ (शिवसेना)- १००
मनीषा जगदीश साबळे (काँग्रेस)- ३६४
नोटा-१३
◆ प्रभाग ७ ब-
स्वप्नील शिंदे (राष्ट्रवादी)- ६९५ विजयी
प्रवीणकुमार वाघमोडे (भाजप)- ५२५
संजय वाघमोडे (काँग्रेस)- २२३
नागेश मदने (शिवसेना)- ७१
रणवीर कदम (अपक्ष)- ६१
नोटा-१४
■ प्रभाग ८ अ-
विकास माने (काँग्रेस)- ७६० विजयी
रवींद्र मानवर (भाजप)- ६७०
हेंमत चौगुले (राष्ट्रवादी )- १७२
नवनाथ पवार (अपक्ष)- ०६
नोटा-१६
◆ प्रभाग ८ ब-
सुप्रिया योगेश बामणे (काँग्रेस)- ७४४ विजयी
सुवर्णा दिपक पाटणकर ( राष्ट्रवादी )-१५३
शारदा चंद्रकांत कुंभार (भाजप)- ६१९
तेजस्विनी बजरंग व्हनमाने (शिवसेना)- ९२
नोटा-१६
■ प्रभाग ९ अ-
शबाना मिरासाहेब जमखंडी (काँग्रेस)- ६१० विजयी
स्वप्ना अशोक स्वामी (भाजप)- ५६९
रेश्मा शाहनवाज नदाफ (राष्ट्रवादी)- ४२३
नोटा-१९
◆ प्रभाग ९ ब-
मोहनभैय्या कुलकर्णी (काँग्रेस)- ६७७ विजयी
दीपक उर्फ संतोष मोटे ( भाजप)- ३३६
लक्ष्मण एडके (राष्ट्रवादी)- ५८७
नोटा- ११
■ प्रभाग १० अ-
फिरोज नदाफ (अपक्ष), ४६६ चिठ्ठी विजयी
पवन कुंभार (भाजप)- ४६६
सलीम नदाफ (काँग्रेस)- ४५७
मोहिद्दीन इनामदार (राष्ट्रवादी)- ३८९
नोटा-११
◆ प्रभाग १० ब-
अनुसया प्रकाश माने ( काँग्रेस) ६७१ विजयी
सुवर्णा बाळासो बामणे (राष्ट्रवादी)- ५३८
सुप्रिया संतोष बाबर( भाजप)- ३०६
संजीवनी दीपक शेटे (शिवसेना)- २६
नरगीस समीरअली नदाफ (अपक्ष)- ४७
तेजस्विनी श्रीकांत सोनवणे (अपक्ष)- १९५
नोटा-०६
■ प्रभाग ११ अ-
काजल राहुल काळे (काँग्रेस)- १२३७ विजयी
सुप्रिया स्वप्नील कोळी (भाजप)- ११७५
प्राजक्ता अनिकेत शिंदे (राष्ट्रवादी)- १६६
नोटा- ३३
◆ प्रभाग ११ ब-
नंदिनी सोमशेखर मठपती (भाजप)- १२१२ विजयी
मीनाक्षी शरणाप्पा अक्की (राष्ट्रवादी)- ४७६
तस्लिम सद्दाम अत्तार (काँग्रेस)- ८९२
नोटा- ३१
◆ प्रभाग ११ क-
मिथुन भिसे (भाजप)- १२०९ विजयी
संग्राम जगताप ( राष्ट्रवादी) – ४०३
कुशाल बिज्जर्गी (काँग्रेस)- ८९७
भास्कर जाधव (शिवसेना)- ६६
नोटा- ३६
■■
नगराध्यक्ष डॉ. आरळी २४९६ मतांनी विजयी
डॉ. रविंद्र आरळी यांनी पहिल्या फेरीपासून मताधिक्य घेतले. पहिल्या फेरीत ८९९ दुसऱ्या फेरीत १२४७ तर तिसऱ्या फेरीत ३५० मतांचे मताधिक्य मिळाले.
जनतेने दिला स्थैर्याचा कौल
एकूण निकाल पाहता, जत शहरातील जनतेने स्थैर्य, विकास आणि नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपच्या हातात सत्तेची सूत्रे दिली असल्याचे स्पष्ट होते. नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
